शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्याची खेळी, विरोधक एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:31 IST

जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राज्यातील विविध पक्षांतील विरोधी नेत्यांनी थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली ३० वर्षे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा करिश्मा पाहता त्यांची राज्याच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना राेखण्यासाठी राज्यस्तरावरील त्यांच्या विराेधकांनी थेट इस्लामपुरात आपापल्या परीने आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जयंत पाटील यांना मतदारसंघातच राेखण्याचा डाव आखला जात आहे.

इस्लामपूर नगरपालिकेच्या गत निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी जयंत विरोधी गटाला ताकद दिली. त्यामुळेच पालिकेतील राष्ट्रवादीची ३० वर्षांची असलेली सत्ता संपुष्टात आली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र विराेधकांचे काही चालले नाही. पुन्हा जयंत पाटील यांनाच जनतेने काैल दिला.

आताही लोकसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या माध्यमातून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आपल्या गटाची मजबूत बांधणी चालविली. मात्र, लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. इस्लामपूर मतदारसंघातही याचा परिणाम झाला. माेठ्या उमेदीने अजित पवार यांच्या पाठीशी गेलेले नेते-कार्यकर्ते नाउमेद झाले. बांधणी होण्याअगोदरच पक्षाला घरघर लागली. मात्र, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागताच राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ऊर्जा आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपुरात प्रथमच एन्ट्री करून बाजी मारली. शिंदेसेनेचा गटही मजबूत केला. हुतात्मा गटाला ताकद देण्याचीही शिंदे यांनी खेळी केली आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेची बांधणी यापूर्वीपासूनच इस्लामपूर मतदारसंघात आहे. लोकसभेच्या निमित्ताने राजू शेट्टी यांचा प्रचार करण्यासाठी इस्लामपूर-शिराळ्यात बच्चू कडू यांनी सभा घेतल्या. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही येथे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राज्यातील विविध पक्षांतील विरोधी नेत्यांनी थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच इस्लामपूर मतदारसंघात उद्योग क्षेत्राला गती दिली आहे. आगामी सर्वच निवडणुकीमध्ये सक्रिय होण्यासाठी नव्याने पक्ष बांधणी सुरू आहे. -केदार पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील