शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा उमेदवारांचे दहा अर्ज

By admin | Updated: September 23, 2014 00:13 IST

जिल्ह्यात सहा उमेदवारांचे दहा अर्ज

सांगली : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आज (सोमवार) सहा उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज दाखल केले. वाळवा, मिरज, जत आणि खानापूर मतदारसंघात आज अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज १८४ अर्जांची विक्री झाली. वाळवा, मिरज आणि खानापूर मतदारसंघात प्रत्येकी एक, तर जत मतदारसंघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. मिरज मतदारसंघात उमेश श्रीरंग धेंडे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. वाळवा मतदारसंघातून बी. जी. पाटील (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला. खानापूर विधानसभेसाठी भक्तराज ठिगळे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांनी एक अर्ज मनसेतर्फे व एक अपक्ष म्हणून दाखल केला आहे. जत विधानसभा मतदारसंघात आज तीन अर्ज दाखल झाले. यामध्ये श्रीरंग पाखरे (हिंदुस्थान जनता पार्टी) व सुनील दलवाई (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बसवराज चिदानंद पाटील यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. सांगली, शिराळा, पलूस-कडेगाव व तासगाव मतदारसंघात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज १८४ अर्जांची विक्री झाली. यामध्ये मिरजेसाठी ३१, सांगलीसाठी २२, वाळवा १८, शिराळा १८, पलूस-कडेगाव २४, खानापूर २४, तासगाव- कवठेमहांकाळ १३ व जत विधानसभेसाठी ३४ अर्जांची विक्री झाली.जत : राष्ट्रीय बसव सेनेच्यावतीने श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार ते जत तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅलीसमवेत पदयात्रा काढून बसवराज पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मिरज : मिरज विधानसभेसाठी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन या पक्षातर्फे निवृत्त सचिव उमेश धेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. १६ उमेदवारी अर्जांची आज विक्री झाली. एमआयएमचे उमेदवार मिरज विधानसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून, पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी प्रचारासाठी मिरजेत येणार असल्याचे रफिक मुल्ला यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, महेश कांबळे, काँग्रेसचे अशोक सांगलीकर, अशोक कबाडगे, दीपक कारंडे, बाळासाहेब होनमोरे, सदाशिव खाडे, दीपक दणाणे, नितीन सोनवणे, आदी १६ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. (प्रतिनिधी)५सांगलीसाठी ५७ अर्जांची विक्रीसांगली विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी २२ अर्जांची विक्री झाली. आजअखेर ५७ अर्जांची विक्री झाली असून, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज अर्ज नेणाऱ्यांमध्ये दिगंबर जाधव, शिवाजी (पप्पू) डोंगरे, विनया पाठक, अनिल शेटे, सुरेश टेंगले, तानाजी सरगर आदींचा समावेश आहे.