शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यात स्वताई; किराणा सामानात महागाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST

सांगली : उन्हाळ्याची चाहूल बाजारपेठेला लागल्याने काही भाज्यांची उपलब्धता कमी होत आहे तर लिंबू, कलिंगड, टरबूज, काकडीला मागणी वाढत ...

सांगली : उन्हाळ्याची चाहूल बाजारपेठेला लागल्याने काही भाज्यांची उपलब्धता कमी होत आहे तर लिंबू, कलिंगड, टरबूज, काकडीला मागणी वाढत आहे. या आठवड्यात ग्राहकांना थोडा फार दिलासा मिळताना भाज्यांचे दर तुलनेने कमी झाले तर काहींचे स्थिर राहिले आहेत. किराणा सामानाच्या दरातील वाढ मात्र, कायमच राहिली. खाद्य तेलांचे दर वाढतानाच धान्याचेही दर वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात सरासरी ६० रूपयांवर असलेल्या फळभाज्यांच्या दरात काहीशी घसरण जाणवली. मात्र, त्याचवेळी कांदा दरात वाढ झाली आहे. कांदा, लसूण आणि बटाटा दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. लसूण सध्या ८० ते १२० तर कांदा ४० ते ५० रूपये किलोने मिळत आहे.

चौकट

मिरचीच्या दरात वाढ

चटणीच्या मिरची दरात वाढ झाली आहे. कर्नाटक, तेलंगणाहून येणाऱ्या मिरच्यांची आवक काहीशी मंदावल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्षभर मागणी असलेल्या या मिरच्यांच्या दरात वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवरील मिरची मात्र, वाजवी दरात उपलब्ध आहे.

चौकट

कलिंगड,चिकूची चलती

फळ बाजारात सध्या सर्वत्र कलिंगडाचे ढीग दिसून येत आहेत. शहरातील विविध भागातही कलिंगडाची विक्री सुरू असून दर कमी असल्याने ग्राहकही मिळत आहेत. याशिवाय अद्यापही चिकूची आवक वाढतच आहे.

चौकट

डाळींना दरवाढीचा तडका

किराणा सामानातील दरवाढ कायमच असल्याने ग्राहक नाराज असतानाच, डाळींचे दरही या आठवड्यात सरासरी ५ ते १० रूपयांनी वाढले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी डाळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मात्र, आता गरजेएवढीच खरेदी सुरू केली आहे.

कोट

भाजीपाला दर आवाक्यात आले आहेत हे समाधानकारक आहे मात्र, या आठवड्यात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांचीही आवक कमी कमी होत आहे. स्थानिक माल सध्या चांगला उपलब्ध होत आहे.

सर्जेराव शिंदे, व्यापारी

कोट

भाजीपाला दर अजूनही कमी आहेत पण म्हणाव्या तशा भाज्या उपलब्ध होत नाहीत. डाळींचे दर वाढले आहेत. अजून किती दरवाढ होईल याची आता बघूनच खरेदी करावी लागणार आहे.

ऋतुजा पवार, गृहिणी

कोट

थंडी कमी होत आहे तशी फळांच्या आवकेवरही परिणाम होत आहे. सध्या आवक समाधानकारक आहे. यामुळे जिल्ह्यासह परिसरातून अद्यापही चांगली मागणी आहे. कलिंगडाची आवक अजूनही वाढेल.

नितीन गिड्डे, व्यापारी