पूरग्रस्तांना दोन हजार किलो तांदूळ पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:28+5:302021-08-27T04:29:28+5:30

भंडारा-गोंदिया शिवसेनेच्यावतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी गुरुवारी दोन हजार किलो तांदूळ घेऊन वाहन पाठविण्यात आले. सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यावेळी ...

Supply of two thousand kilos of rice to the flood victims | पूरग्रस्तांना दोन हजार किलो तांदूळ पुरवठा

पूरग्रस्तांना दोन हजार किलो तांदूळ पुरवठा

भंडारा-गोंदिया शिवसेनेच्यावतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी गुरुवारी दोन हजार किलो तांदूळ घेऊन वाहन पाठविण्यात आले. सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यावेळी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भंडारा-गोंदिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी २ हजार किलो तांदूळ पुरवठा केला. शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी तो स्वीकारत भंडारा, गोंदिया शिवसेनेचे आभार मानले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुजाताताई इंगळे, मनीषा पाटील, सरोजिनी माळी, महेंद्र चंडाळे, चंद्रकांत मैगुरे, संजय काटे, विशालसिंग रजपूत, किरण रजपूत, नाना शिंदे, सूरज कासलाकर, हरी लेंगरे, विजय शिंदे, रूपेश मोकाशी, अमोल पाटील, प्रसाद रिसवडे, ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते.

चौकट

शिवसेनेचा नेहमीच मदतीचा हात

संकटकाळात शिवसेना नेहमीच लोकांच्या मदतीला जाते. राज्यातील शिवसैनिक पूरग्रस्त सांगलीला त्याच भावनेतून मदत करीत आहोत, असे मत विभुते यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Supply of two thousand kilos of rice to the flood victims