शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पाण्याविना वाड्यावस्त्यांचे हाल नकाेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

ओळी : शिराळा तहसील कार्यालयात आयाेजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, ...

ओळी : शिराळा तहसील कार्यालयात आयाेजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, युवानेते विराज नाईक व गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याविना कोणत्याही गावचे अथवा वाडी, वस्तीचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, आशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.

शिराळा तहसील कार्यालयात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे व युवानेते विराज नाईक उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, शिराळा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने उन्हाळ्यात येथील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. ही गावे विशेषतः डोंगरमाथ्यावरील आहेत. त्यामध्ये सोनवडेपैकी काळोखेवाडी व जळकेवाडी, रांजणवाडी, बेंगडेवाडी, शिंदेवाडी, चिंचेवाडी, खराळे, वाकाईवाडी, आरळापैकी बेरडेवाडी व येसलेवाडी, खेड, बेलदारवाडी, गुंडगेवाडी-करुंगली या गावांचा सामावेश आहे. प्रशासनाने पाणीटंचाईचे नियोजन करताना, येथे पाण्याचा स्रोत उपलबद्ध आहे, तेथे कूपनलिका घ्याव्यात. ज्या ठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे, त्या अधिग्रहण कराव्यात. जेथे कोणताच स्रोत उपलब्ध नाही, तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, जेणेकरून नागरिकांचे पाण्याविना हाल होणार नाहीत, याची संपूर्णपणे खबरदारी घ्यावी.

तहसीलदार गणेश शिंदे यांनी स्वागत करून टंचाई जाणवणाऱ्या गावांचा आढावा घेतला. येथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर सविस्तरपणे चर्चा केली. आमदार नाईक यांनी प्रत्येक गावाची ग्रामसेवकाकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यावरून काही मार्गदर्शक सूचना दिल्या. या बैठकीला गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, पंचायत समितीचे उपअभियंता बाहुबली हुकिरे, सर्व गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.