शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व कामगारांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात डॉ. सुरेश भासले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जितेद्र पाटील, सुर्यकांत दळवी, ...

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात डॉ. सुरेश भासले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जितेद्र पाटील, सुर्यकांत दळवी, संजय पाटील, दयाभाऊ पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : कारखान्याने अनेक अडचणींचा सामना करत सलग सहा वर्षे उत्कृष्टरित्या गळीत हंगाम पार पाडला आहे. शेतकरी सभासद व कामगारांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखान्याने यशस्वी वाटचाल केल्याचे गौरवोद्‌गार अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले यांनी काढले.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी विद्या जगताप यांच्याहस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा झाली. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, गिरीश पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी चांगली पगारवाढ या संचालक मंडळाने दिली आहे. डॉ. सुरेश भाेसले यांनी शिस्त लावल्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, कारखान्याने १५४ दिवसांमध्ये १२ लाख १५ हजार टन उसाचे गळीत केले असून, १४ लाख ७५ हजार क्विंटल साखर निर्मिती केली असून साखर उतारा १२.७५ टक्के राहिला आहे.

सचिव मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, धनंजय पाटील, कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थिती होते.