शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार शिगेला : नेत्यांना वाघ, नाग आणि सागाची उपमा

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण

अशोक पाटील -इस्लामपूर - विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. राज्यपातळीवर आघाडीची बिघाडी झाली, तर युतीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. तिघांचाही प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाळवा-शिराळा सीमारेषेवर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेल्या गावांतून तिघांचेही राजकारण एकवटले आहे. वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण जोडले जाऊ लागले आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे ‘वाळव्याचा वाघ’ म्हणजे जयंत पाटील यांनी राजकारणातील स्थान टिकवून ठेवले आहेत. शिवाजीराव नाईक म्हणजेच शिराळ्याचा नाग. पाटील व नाईक यांच्यामधील संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. त्यात आता नव्यानेच कोकरुड म्हणजे डोंगरी भागातील सागवानाची भर पडली आहे. ‘सागवान म्हणजे सत्यजित देशमुख’ असे नवीन समीकरण प्रचारसभेतून गाजू लागले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. कणेगाव, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, पेठ, नेर्ले, कासेगाव ही गावे शिराळा मतदारसंघातील मोठी गावे आहेत. या गावांतील मतदारच शिराळ्याचा आमदार ठरवत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे नारायण राणे यांनी कामेरी येथे सभा घेतली. याच गावात भाजपकडून नितीन गडकरी यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. ते म्हणतील तोच आमदार, असे समीकरण असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ते आहेत. भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांचे पानिपत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच याहीवेळी वाघ-नागाचा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आणलेल्या निधीतून केलेल्या विकास कामांच्या ताकदीवर त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी आणि भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.डोंगरी भागातील मुंबईचे मतदान खेचण्याचे प्रयत्न तिन्ही उमेदवारांकडून केले जात आहेत. मुंबई येथे जाऊन प्रचार सभाही घेण्यात आल्या आहेत. वाघ, नाग आणि सागाचे राजकारण चांगलेच रंगले असून, कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाव वधारला आहे.वाळव्यातील ४८ गावेच केंद्रबिंदूप्रचाराच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघात सध्या शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. ही गावे शिराळ्याचा आमदार ठरवित असल्याने याच भागात दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत.