शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मीडिया’वर चोरांच्या अफवांचा बाजार!

By admin | Updated: August 4, 2015 23:37 IST

पोलीस हैराण : जिल्ह्यात तीन हजार परप्रांतीयांची घुसखोरी झाल्याची चर्चा; गावोगावी गस्त सुरूच

सचिन लाड- सांगली -बिहार, मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून सुमारे तीन हजार परप्रांतीयांनी चोऱ्या करण्यासाठी सांगली जिल्ह्यात शिरकाव केल्याची अफवा ‘सोशल मीडिया’वरून पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचे वर्णन, त्यांच्याकडील हत्यारांची छायाचित्रेही प्रसारित केली जात आहेत. चोरांना पकडण्यासाठी अनेक दिवसांपासून गावोगावी गस्त सुरू आहे, पण गस्त घालणाऱ्यांना चोरांचे अद्याप दर्शन झालेले नाही. या अफवांमुळे पोलीस त्रस्त आहेत.चोरटे गावात घुसल्याची चर्चा वाळवा, शिराळा तालुक्यातून सुरू झाली. तेथे गावकऱ्यांची गस्त सुरू झाली. मात्र इस्लामपुरात दोन दिवसांपूर्वी गस्त घालणारे तरुणच चोर निघाले. मग गावकऱ्यांनी आता विश्वास कोणावर ठेवायचा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात गावोगावी गस्त सुरू आहे. पण ग्रामस्थांना एकही चोर सापडलेला नाही. चोर असल्याच्या संशयावरून विनाकारण काहीजणांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयित चोरांकडे पोलिसांनी चौकशी केली, मात्र ते रात्री कामावरून येणारे किंवा परगावहून आलेले असल्याचे समजले. जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या गावकऱ्यांची रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत गस्त सुरू आहे. त्यांच्या जोडीला पोलीसही रात्रभर जागत आहेत. ‘चोर आलेऽऽ आलेऽऽ...’, म्हणून गावकरी दंगा करतात. चोरांच्या दिशेने पळत जातात. परंतु तेथे कोणीच नसते. ‘अंधारात पळून गेले’, असा सूर काढून गावकरी गप्प बसत आहेत.ग्रामीण भागातील चोर व गस्तीचे लोण आता शहरापर्यंत आले आहे. गेल्या पंधरवड्यात सांगली शहरात लूटमारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये पकडलेले लुटारू सांगलीतील निघाले आहेत. गुरुवारी रात्री हरिपूर, कवठेपिरान व कवलापूर या गावात चोर आल्याची अफवा पसरली. पाठलाग करूनही चोर सापडले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसही जी माहिती मिळेल, त्यानुसार गावोगावी जाऊन भेट देत आहेत. गावकऱ्यांनी गस्त घालताना दंगा करू नये, त्यांना पकडायचे असेल, तर नियोजनबद्ध आणि शांततेत गस्त घालण्याची गरज आहे. गस्त सुरू असताना काहीजणांच्या घरावर दगड पडतातच कसे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर चोरांचे वर्णन व त्यांच्याकडे असलेले छायाचित्र प्रसारित केले जात आहे. मित्रांनो, सावधान!सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, विट्यात दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांनी कबूल केले आहे की, आम्ही एक-दोन नसून, तीन हजार आहोत... मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून ते आले आहेत. तीन ते चार वर्षांच्या मुलांना ते पळवून नेत आहेत. आपल्या गावात शंकास्पद व्यक्ती वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. गाफील राहू नका. सर्वांना नम्र विनंती की, आपले मोबाईल चार्जिंग करून त्यावर पुरेसा बॅलन्स ठेवावा. जेणेकरून चोर आले तर, एकमेकांच्या मदतीसाठी संपर्क साधता येईल. चोर गावातील विजेचे दिवे बंद करतात. ते दिवसभर पाहणी करून जातात. लहान मुलांवर लक्ष ठेवा. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. हसण्यावारी नेऊ नका...