इस्लामपुरात शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:46+5:302021-04-11T04:25:46+5:30

इस्लामपूर : मागच्या मार्च-एप्रिल महिन्यांतील चार टप्प्यांतील लॉकडाऊनचा अनुभव पाठीशी असलेल्या इस्लामपूरकरांनी दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

Shutter down in Islampur | इस्लामपुरात शटर डाऊन

इस्लामपुरात शटर डाऊन

इस्लामपूर : मागच्या मार्च-एप्रिल महिन्यांतील चार टप्प्यांतील

लॉकडाऊनचा अनुभव पाठीशी असलेल्या इस्लामपूरकरांनी दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी पहिल्या दिवशी सगळे शहर बंद राहिले. नागरिकांनी घरात थांबणे पसंत केल्याने रस्ते सुनसान पडले होते.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे चित्र होते.

वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे आवश्यक बनले होते. कोरोना संसर्ग साखळी रोखण्यासाठी नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीला अटकाव घालणे गरजेचे असते, हे यापूर्वीच्या लॉकडाऊनवरून अनुभवायला मिळाले आहे. त्यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. दिवसभरात पोलिसांना बळाचा वापर करावा लागला नाही. दक्षता म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दिवसभर शहरातील रस्ते सुनसान झाले होते. पूर्ण शहर शटर डाऊन होते.

फोटो-

इस्लामपूर शहरातील रस्ते शनिवारी असे सुनसान झाले होते.

Web Title: Shutter down in Islampur