शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बारा तासांत दुचाकीवरून ६५२ किमी प्रवास, श्रेया'च्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:39 IST

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील येवले कुटुंबीयांची सून श्रेया शंतनू येवले-पाटील या तरुणीने केवळ १२ तास ४ मिनिटांत ...

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील येवले कुटुंबीयांची सून श्रेया शंतनू येवले-पाटील या तरुणीने केवळ १२ तास ४ मिनिटांत ६५२ किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करत एक विक्रम रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.श्रेया येवले यांचे माहेर कोल्हापूर असून, त्या छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी करतात. त्यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून पहाटे ४:३२ वाजता दुचाकीवर प्रवास सुरू केला. त्यांच्या या प्रवासाचा शेवट रात्री ८:१५ वाजता पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात झाला. दरम्यान, त्यांनी ६५२ किलोमीटर अंतर पार केले. त्र्यंबकेश्वर, विघ्नेश्वर, लेण्याद्री, गिरिजात्मक, भीमाशंकर खेड, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्दिविनायक, मोरगावचा मयुरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, महाडचा वरदविनायक करत पालीच्या बल्लाळेश्वरापर्यंत १५ तास ४८ मिनिटे कालावधी लागला होता तर प्रत्यक्षात १२ तास ४ मिनिटांत ६५२ किलोमीटरचे अंतर पार करत भारत रेकॉर्ड बुकमध्ये आपली कामगिरी नोंदवली आहे. या राईडमध्ये तिने आठ अष्टविनायक, दोन ज्योतिर्लिंग आणि खंडोबाला एकचक्रे प्रदक्षिणा घातली आहे. या प्रवासात श्रेया हिने गाडीचे इंधन भरणे व मंदिरांमध्ये काही काळ थांबलेली होती. त्यामुळे तिने प्रत्यक्षात १२ तास ४५ मिनिटांमध्ये ही राईड पूर्ण केली. श्रेया यांना दुचाकी राईडची पहिल्यापासूनच आवड आहे. महिलांना दुचाकीवरून लांब प्रवास करणे कठीण आहे, असे समजले जात होते; परंतु महिलांमध्ये ती क्षमता असून, हे महिलाही करू शकतात, हे दाखवून देण्याचा श्रेयाने निर्धार केला. त्यामुळेच त्यांनी ही दुचाकी राईड करण्यात ती यशस्वी झाली.

अनेकदा महिलांना ‘तू हे करू शकत नाहीस’ असे सांगितले जाते; पण त्या सर्वांना आपल्या क्षमतेचा दाखला देत श्रेया यांनी दाखवून दिले की महिलाही कठीण वाटणारे उद्दिष्ट पूर्ण करू शकतात. या यशस्वी राईडसाठी पती शंतनू येवले, सासरे आनंदराव येवले, माहेरचे पाटील कुटुंबीय व रायडर सन्मेष व्होरा यांचे मार्गदर्शन लाभले. - श्रेया येवले-पाटील

English
हिंदी सारांश
Web Title : Shreya Yeole enters India Book of Records with 652km bike ride.

Web Summary : Shreya Yeole-Patil covered 652 km on a bike in just over 12 hours, earning her a place in the India Book of Records. She started from Trimbakeshwar, visited eight Ashtavinayak temples, two Jyotirlingas, and completed the ride at Pali's Ballaleshwar temple, proving women can achieve challenging feats.