शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार! वाळव्यात काळी जादू; स्व. राजाराम बापूंच्या फोटोला टाचण्या टोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 20:34 IST

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोला टाचण्या टोचल्याचे आणि फोटोवर लिंबू ठेवल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत.  



या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे, "सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, "असे पवार यांनी म्हटले आहे.

"पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारं आहे. हे करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही विनंती!, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी १९०० इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६५७ व पंचायत समितीसाठी एक हजारांवर अर्जांचा समावेश आहे. दाखल अर्जांची गुरुवार दि. २२ रोजी छाननी होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले.

पाच दिवसांच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Black magic incident: Pins stuck in Rajaram Bapu Patil's photo

Web Summary : A shocking incident occurred in Walwa taluka where pins were found stuck in the photo of Late Rajaram Bapu Patil, with a lemon placed on it, sparking outrage. Rohit Pawar condemned the act. Ahead of elections, a record 1900 applications were filed for council positions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Sangliसांगली