शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत शिवसेना पदाधिकाऱ्यासह हॉटेलचालक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:28 IST

काझी समर्थकांनी हल्लेखोरांची घरे, वाहने फोडली : दोन गटांत राड्यामुळे मिरजेत काही काळ तणाव 

मिरज : मिरजेत आर्थिक वादातून शिवसेना शिंदे गटाचा समन्वयक मतीन दाऊद काझी (वय ३२) याच्यासह हॉटेलचालक दाम्पत्यावर हॉटेलमध्ये कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात मतीन काझी याच्यासह हॉटेलचालक व त्यांची पत्नी जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त काझी समर्थकांनी एजाज शेख व त्याच्या साथीदारांच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली. दोन गटांत राड्यामुळे मिरजेत काहीकाळ तणाव होता.मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र येसुमाळी यांचे रस्सा नावाचे हॉटेल आहे. हॉटेलचालक येसुमाळी यांनी पिंटू सय्यद या कामगाराचा पगार दिला नसल्याचा वाद सुरू होता. या वादातून मिरजेतील एका खून प्रकरणातील आरोपी एजाज शेख व त्यांचे साथीदार अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला व शिव अथणीकर यांनी शनिवारी रात्री हॉटेलवर जाऊन जोरदार राडा केला. हॉटेलचालक रवींद्र येसुमाळी व त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.यावेळी शिवसेना शिंदें गटाचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने हल्लेखोरानी काझी याच्याही हातावर कोयत्याने हल्ला केल्याने काझी याच्यासह तिघे जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये नेण्यात आल्यानंतर काझी समर्थकांनी सिव्हील आवारात मोठी गर्दी केली. तणाव वाढत असल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावाला पांगविले. मतीन काझी समर्थकांनी मध्यरात्री सुभाषनगर व टाकळी रस्त्यावर एजाज शेख, अमन गोदड, इकलास खाटीक या तिघांच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोडतोड केली. याप्रकरणी शहर पोलिसात मतीन काझी याने अमन गोदड, शिव अथणीकर सोहेल नदाफ व त्याच्या दोन साथीदारांनी कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे. हॉटेलात कोयत्याने केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज शहरात व्हायरल झाले होते. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस