शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बारा कारखान्यांची धुराडी अखेर पेटली

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

उतारा घटला : जिल्ह्यात तीन लाख टन उसाचे गाळप

सांगली : ऊस दराच्या आंदोलनाचा अंदाज घेत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. अनेकांनी प्रारंभ करून गळीत हंगाम थांबविले होते. गेल्या पंधरा दिवसांत अकरा साखर कारखान्यांनी तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उतारा मात्र सरासरी ९.९९ टक्केच असल्यामुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. यामध्ये सहकारी चौदा आणि खासगी दोन कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी वसंतदादा साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. मात्र ऊस उत्पादकांची बिले दिली नसल्यामुळे साखर आयुक्तांनी त्यांचा परवाना रोखला आहे. परंतु, कारखाना प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत परवाना मिळविणार असून, लवकरच गळीत हंगाम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यशवंत (गणपती संघ), माणगंगा कारखान्यांचे गळीत हंगाम अद्याप सुरू झाले नाहीत. विश्वास, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, उदगिरी शुगर, सदगुरू श्री श्री रविशंकर, केन अ‍ॅग्रो, महांकाली, राजारामबापू पाटील युनिटच्या चारही शाखांसह बारा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू झाले आहेत. अकरा साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन लाख टन उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्या चारही शाखांमध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक गाळप झाले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असले तरी साखरेचा उतारा मात्र कमी मिळत असल्याच्या कारखाना प्रशासनाच्या तक्रारी आहेत. साखरेचा उतारा कमी आल्यास ऊस दर देण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम धडाक्यात सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

गाळपाची स्थिती (टनात)
कारखानागाळपउतारा
हुतात्मा४७०००११.२१
विश्वास४७११०१०.३६
सोनहिरा४४८३८१०.००
क्रांती६७१००१०.१०
उदगिरी शुगर३१३३३१०.०५
श्री श्री रविशंकर ३१४६०८.८२
महांकाली५३००....


आंदोलकांनी काढला पळ
सध्या साखर कारखानदारी अडचणीत असल्यामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देता येत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष पॅकेजची गरज आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडण्याची गरज होती. परंतु, संघटनांच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा मंत्रीपदे महत्त्वाची वाटू लागली आहेत. त्यामुळे ते यावर्षी आंदोलने करणार नाहीत. त्यांनी आंदोलनातून एकप्रकारे पळच काढला आहे, अशी टीका क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी केली.