Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठरला सर्वात मोठा

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2026 18:31 IST2026-02-09T18:29:59+5:302026-02-09T18:31:06+5:30

यंदा भाजपच्या आठ जागा कमी झाल्या

Sangli ZP Election Results 2026 Jayant Patil holds the fort NCP Sharad Pawar faction becomes the largest surpassing BJP | Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठरला सर्वात मोठा

Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांनी बालेकिल्ला राखला, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठरला सर्वात मोठा

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ गटांपैकी १८ जागा जिंकून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष झाला आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून, त्यांचे १६ उमेदवार विजय झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. दहा पंचायत समित्यांपैकी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी दोन पंचायत समितींची सत्ता मिळाली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा मिरज तालुक्यात १८ जागा मिळवून जिल्हा परिषदेतील नंबर एकच पक्ष ठरला आहे. शिंदेसेनेने खानापूर, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांत उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे पलूस, कडेगाव, मिरज आणि तासगाव तालुक्यातून ११ उमेदवार विजय झाले आहेत. कडेगाव, पलूसमध्ये पक्षाला मोठे यश मिळाले आहे.

भाजपने जत तालुक्यात सर्वाधिक ८ जागा मिळविल्या असून त्यानंतर सहा जागा मिरज तालुक्यात मिळाल्या आहेत. वाळवा, आटपाडी तालुक्यात प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपची मोठी पिछाडी झाल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणूकीत जिल्हा परिषदेत २४ जागा भाजपच्या होत्या. यामध्ये आठ जागा कमी करून १६ जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिरज दोन, तासगाव दोन जागा, तर शिराळा, आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उद्धवसेनेनेही खाते खोललेले असून, वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून अभिजित पाटील विजयी झाले आहेत. जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.

जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांपैकी भाजपा : जत, मिरज, राष्ट्रवादी (शरद पवार) : वाळवा, कवठेमहांकाळ, राष्ट्रवादी (अजित पवार) : तासगाव तर शिराळ्यात राष्ट्रवादी राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची सत्ता आली आहे.
काँग्रेस : पलूस, कडेगाव, शिंदेसेना : खानापूर, आटपाडी पंचायत समित्यांची सत्ता मिळाली आहे. भाजपला मिरज पंचायत समितीत काटवरचे बहुमत असून, ते मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेवर येऊ शकतील.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

  • भाजप - १६
  • शिवसेना (शिंदे) -०७
  • उद्धवसेना - ०१
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - ०६
  • काँग्रेस - ११
  • राष्ट्रवादी (शरद पवार) - १८
  • जनसुराज्य - १
  • रयत क्रांती - १

Web Title : सांगली ZP चुनाव: NCP (शरद पवार) का दबदबा, भाजपा पीछे

Web Summary : सांगली ZP चुनावों में, NCP (शरद पवार) 18 सीटों के साथ सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी, भाजपा के 16 से ज़्यादा। किसी भी पार्टी को स्पष्ट बहुमत नहीं मिला। दस पंचायत समितियों में भाजपा, शिंदे सेना, NCP गुटों और कांग्रेस के बीच सत्ता विभाजित है।

Web Title : Sangli ZP Election: NCP (Sharad Pawar) Dominates, BJP Trails Behind

Web Summary : In Sangli ZP elections, NCP (Sharad Pawar) emerged as the largest party with 18 seats, surpassing BJP's 16. No party secured a clear majority. The power is split between BJP, Shinde Sena, NCP factions, and Congress in ten Panchayat Samitis.