Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल

By संतोष भिसे | Updated: February 9, 2026 14:05 IST2026-02-09T13:58:59+5:302026-02-09T14:05:00+5:30

आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी मोठा धक्का

Sangli ZP Election Results 2026 Defeat in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Shirala taluka where BJP has MLA | Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल

Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल

सांगली : भाजपचा आमदार असलेल्या शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र पक्षाची हाराकिरी झाली आहे. कोकरुड या अवघ्या एका गटात पक्षाला विजयाचा गुलाल उधळता आला आहे. उर्वरित तीनही जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

कोकरुडमध्ये साईतेजस्वी यांच्या समवेत पंचायत समितीसाठी कोकरुड गणातून भाजपचे बाजीराव पाटील आणि कणदूर गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे सम्राटसिंग नाईक निवडून आले आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचा एकत्रित झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. भाजपचे वर्चस्व असणारी पंचायत समिती हातातून गमवावी लागली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यासाठी हा विजय महत्वाचा ठरला आहे. मानसिंगराव यांनी विधानसभेतील पराभवाचा उट्टे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काढल्याचे मानले जाते. मांगले गटातून राष्ट्रवादीचे विराज नाईक विजयी झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक गटातून राजेश्वरी रणधीर नाईक, वाकुर्डे गणातून रवींद्र आढाव आणि पाचुंब्रे गणातून सविता महाडिक हे अजित पवार गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title : सांगली: शिराला ZP चुनाव में भाजपा परास्त, NCP की जीत का जश्न

Web Summary : सांगली के शिराला में भाजपा विधायक के बावजूद, ZP चुनाव में NCP का दबदबा रहा। भाजपा केवल एक समूह जीता। NCP के नाइक को फायदा, पिछली हार का बदला। भाजपा नेताओं के लिए बड़ा झटका।

Web Title : BJP Routed in Shirala ZP Election; NCP Celebrates Victory.

Web Summary : In Shirala, despite a BJP MLA, NCP dominated ZP elections. BJP won only one group. NCP's Naik gains, avenging past losses. A major setback for BJP leaders.