Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:03 IST2026-03-28T11:58:59+5:302026-03-28T12:03:12+5:30

US Kharg  Iran War: इराणची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खार्ग बेटावर अमेरिकेची नजर आहे. याच बेटावर अमेरिका हल्ला करणार असल्याचे रिपोर्ट्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. 

Iran War: America's eyes on Iran's Kharg Island! Why does it want the enemy nation's 'lifeline'? | Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे?

Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खार्ग बेटावर यापुढेही लष्करी करू, असा इशारा दिला आहे. पर्शियन गल्फमध्ये असलेले हे बेट इराणची लाइफलाइन म्हणून ओळखले जाते. इराणच्या शेजारी असलेल्या बेटावर प्रचंड मोठे तेलसाठे आहेत. आता याच खार्ग बेटावर डोनाल्ड ट्रम्प यांचा डोळा आहे. त्यामुळे अमेरिकेला हे बेट का हवेय? असा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चिला जात आहे. 

१३ मार्च रोजी असे रिपोर्ट्स समोर आले की, अमेरिकेच्या लष्कराने खार्ग बेटावर बॉम्ब वर्षाव केला. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते की, तेथील लष्करी ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. पण, अमेरिकेच्या लष्कराने तेथील तेल साठ्यांना लक्ष्य केलेले नाही, असेही ते म्हणाले होते. 

अमेरिका खार्ग बेट ताब्यात घेणार?

अमेरिकेतील एक्सिओस या माध्यम संस्थेने शुक्रवारी (२७ मार्च) या विषयाची माहिती असलेल्या चार सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. ज्यात म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचा किंवा त्याची नाकेबंदी करण्याच्या मोहिमेबद्दल विचार करत आहे. या कारवाईचा उद्देश इराणवर दबाव आणणे आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी म्हणून अमेरिकेला हा दबाव आणायचा आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाच्या सामुद्रधुनींपैकी एक आहे. ही सामुद्रधुनी इराणच्या किनाऱ्याला लागून आहे आणि युद्ध सुरू झाल्यापासून इराणने या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर बंदी घातली आहे. 

बीबीसी वृत्तसंस्थेशी बोलताना व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अमेरिकेचे सैन्य कोणत्याही वेळी खार्ग बेट आपल्या ताब्यात घेऊ शकते."

या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, "ट्रम्प यांचा सैनिक पाठवण्याचा कोणताही उद्देश नाही, पण कमांडर-इन-चीफ म्हणून त्यांच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत."

खार्ग बेट, अमेरिकेचा उद्देश काय?

राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एरन मॅकलिन यांनी याबद्दल म्हटले आहे की, अमेरिकेचा हाच विचार असू शकतो की, खार्ग बेटावर ताबा घेऊन त्याचा वापर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणवर दबाव आणण्यासाठी केला जाऊ शकतो. 

ट्रम्प यांनीही यापूर्वीच इराणला इशारा देताना म्हटले होते की, जर इराण किंवा इतर देशांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर सुरक्षितपणे जाण्यावर हस्तक्षेप केला , तर आम्ही खार्ग बेटावरील तेल साठ्यांना लक्ष न करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करू.

अमेरिकेकडून सुरू असलेल्या या हालचालींनंतर इराणनेही अमेरिकेला इशारा दिला आहे. खार्ग किंवा इतर तेल साठ्यांवर जर हल्ले झाले, तर अमेरिकेसोबत काम करणाऱ्या कंपन्यांच्या तेल साठे आणि प्रकल्पे उद्ध्वस्त करू. इतकंच नाही, तर बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करू असा इशारा दिला आहे. 

Web Title : ईरान युद्ध: अमेरिका की निगाहें ईरान के खर्ग द्वीप पर, क्यों है यह इतना महत्वपूर्ण?

Web Summary : अमेरिका, ईरान पर होर्मुज जलसंधि खोलने का दबाव बनाने के लिए खर्ग द्वीप पर सैन्य कार्रवाई पर विचार कर रहा है. ईरान ने जवाबी कार्रवाई की चेतावनी दी है.

Web Title : Iran War: US Targets Iran's Kharg Island, a Vital Lifeline

Web Summary : US considers military action on Kharg Island to pressure Iran to open the Strait of Hormuz, a key oil transit route. Iran warns of retaliation.