Dombivli Video: पगार थकला, चालक संतापला; मालकाची कार डम्परने चिरडली, डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:59 IST2026-03-28T12:54:26+5:302026-03-28T12:59:03+5:30
डोंबिवलीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ डम्पर एका कारला फरफटत नेऊन चिरडताना दिसत आहे.

Dombivli Video: पगार थकला, चालक संतापला; मालकाची कार डम्परने चिरडली, डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
एमएमआरडीकडून टिटवाळा ते माणकोली मोठागाव बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या याच रस्त्यावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका डम्पर चालकाने चक्क ठेकेदार असलेल्या मालकाचीच कार डम्परने फरफटत नेली आणि समोरच्या डम्परवर आदळली. यात कारचे नुकसान झाले आहे. हे कृत्य डम्पर चालकाने पगाराच्या वादातून केल्याचे समोर आले आहे.
डोंबिवली पश्चिममध्ये असलेल्या राजूनगर भागात ही घटना घडली आहे. रस्त्याचे काम करत असलेल्या ठेकेदाराकडून कामगार आणि वाहन चालकांचे वेतन वेळेत न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडली.
शेकडो मजूर या रस्त्याचे काम करतात. महिना उलटून गेला तरी पगार न दिला गेल्याने कामगारांकडून पगार करण्याची मागणी होत आहे. पगार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने डम्पर चालकाला राग आला.
डोंबिवली शॉक!
— SANTOSH PANDEY (@Santosh53172026) March 27, 2026
राजू नगर में नाराज डंपर चालक ने ठेकेदार की कार को 15 फीट घसीट लिया। कार क्षतिग्रस्त, चालक फरार।#Dombivli#RajuNagar#Maharashtrapic.twitter.com/H1iWEWEHTh
रस्त्यावर भर टाकण्यासाठी मुरूम घेऊन एक डम्पर जात होता. त्यावेळी तिथे ज्या ठेकेदाराकडे वेतन थकले आहे, त्याची गाडी डम्पर चालकाला दिसली. ही गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी होती, तर मालक बाजूला रस्त्याच्या कामाची पाहणी करत होता.
Dombivli, Maharashtra
Dumper driver upset over unpaid wages rammed contractor’s Kia Sonet 😡
Dragged 10–15 meters before crashing into another parked dumper. Driver fled.
Workplace tension ka price road pe kyun bhugatna padta hai? #Dombivli#RoadChaos#WorkerAngerpic.twitter.com/dPkztR8OTz— Trending Topics with Faiz (@newswithaftab14) March 26, 2026
डम्पर चालकाला ठेकेदाराचे वाहन असल्याचे कळले. त्याला राग अनावर झाला आणि त्याने कार डम्परने फरफटत नेत समोर उभ्या असलेल्या डम्परवर नेऊन आदळली. दहा-पंधरा फूट अंतर फरफटत नेल्याने कारचे बरेच नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर डम्पर चालक फरार झाला.