सांगली कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:27+5:302021-09-03T04:26:27+5:30

मी कार्यकर्ता ... सांगलीत नुकत्याच एका राजकीय कार्यक्रमासाठी ग्रामीण कार्यकर्ते आले होते. दहावर काटा आला तरी आभार प्रदर्शनाची चिन्हे ...

Sangli whispers | सांगली कुजबुज

सांगली कुजबुज

मी कार्यकर्ता ...

सांगलीत नुकत्याच एका राजकीय कार्यक्रमासाठी ग्रामीण कार्यकर्ते आले होते. दहावर काटा आला तरी आभार प्रदर्शनाची चिन्हे दिसेनात. आत भाषणबाजी जोरात सुरु होती आणि बाहेर मात्र अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. विषय होता सेलिब्रेशनचा. कार्यक्रमासाठी साहेबांसोबत सांगलीत आलेल्या कार्यकर्त्यांना जीवाची सांगली करायची होती, पण कार्यक्रम संपेपर्यंत बार आणि हॉटेल्स बंद होण्याची चिंता होती. अखेर त्यांनी मध्येच पल्टी मारली. गाडी काढली आणि थेट बार गाठला. साहेबांनी दिलेल्या पैशांत जिवाची सांगली केली. इकडे साहेबांचा जयजयकार सुरु होता, तर तिकडे कार्यकर्ते मंडळी झिंगायला लागली होती.

काॅंग्रेसची दुष्काळी उपाययोजना

आमदार विक्रम सावंत यांच्याकडे काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्याचा कार्यक्रम झाला. पक्षाचे जत तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार बोलायला उठले, पण थांबण्याचे नाव काही घेईनात. बरीच वक्तेमंडळी अद्याप बोलणार असल्याने संयोजकांनी त्यांना आवरते घेण्याची सूचना केली. पण बिराजदारांनी ठोक्यात सुनावले, आतापर्यंत सांगलीकरांनी जतवर अन्यायच केलाय. आता थांबवू नका. सुत्रे आमच्याकडे आली आहेत. काॅंग्रेस पक्षाने जतकडे सुत्रे सोपवताना जतकरांचा आत्मविश्वासही वाढवलाय हेच खरे!

Web Title: Sangli whispers