शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात

By अविनाश कोळी | Updated: October 3, 2024 21:17 IST

Maharashtra assembly Election 2024: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारच्या सांगली दौऱ्याने भाजपला धक्का बसला. आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.

- अविनाश कोळी सांगली  - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारच्या सांगली दौऱ्याने भाजपला धक्का बसला. आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर खळबळ माजली आहे.

शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत आले. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील आदी नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चा केली. राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांचा सत्कार शरद पवारांनी केला. खानापूर मतदारसंघातून त्यांनी इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारीची मागणीही केली.

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवारांशी पंधरा मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षच त्यांच्या भेटीला आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्याही प्रवेशाची चर्चा रंगली. मिरज मतदारसंघातून बाळासाहेब होनमोरे यांनीही उमेदवारीची मागणी केली. यावेळी पवार गटाचे संजय बजाज, सागर घोडके, राहुल पवार आदी उपस्थित होते.

उमेदवारीची चर्चा जयंतरावांच्या उपस्थितीतअनेक नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्यापुढे इच्छा व्यक्त केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नसल्याने त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करु, असे आश्वासन शरद पवार यांनी सर्वांना दिले.

 काँग्रेस नेत्यांची भेटही चर्चेतसांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनीही शरद पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांच्या भेटीनेही सांगलीत राजकीय चर्चेला उधाण आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीSangliसांगलीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी