शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
5
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
6
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
7
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
8
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
9
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
10
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
11
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
12
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
13
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
14
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
15
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
16
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
17
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
18
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
19
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
20
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पलाश मुच्छलच्या मुंबईतील घरी सांगली पोलिसांचा छापा, राहत्या घरी न सापडल्याने शोध मोहीम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:51 IST

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई

सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. विज्ञान प्रकाश माने यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने मुंबईत छापेमारी केली. त्याच्या राहत्या घरी तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सांगलीत क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा होता; पण तो काही कारणांनी रद्द झाला. हा विवाह मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला होता. मुच्छल यांनी २०२५ मध्ये फिर्यादी विज्ञान माने यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी २५ लाख रुपये घेतले होते.

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या २५ लाखांची मागणी केली. त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातिवाचक शिवीगाळ केली. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर होळकर, गौतम कांबळे, संतोष गळवे यांनी मुंबईत छापेमारी केली. मुच्छल हा त्याचा मुंबईच्या घरी आढळून आला नाही. पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे. उपअधीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Police raid Palash Muchhal's Mumbai home in abuse case.

Web Summary : Police raided musician Palash Muchhal's Mumbai home after an atrocity case was filed against him for alleged casteist abuse. He was not found at his residence, and a search is underway. The case stems from a financial dispute and alleged abuse in 2025.