शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: एलईडी प्रकल्पामुळे महापालिकेला ७०० कोटींचा भुर्दंड - पृथ्वीराज पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:47 IST

'समुद्रा'चा करार रद्द करून श्वेतपत्रिका काढा

सांगली : महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवण्यासाठी समुद्रा कंपनीशी केलेला करार एकतर्फी व कंपनीच्या हिताचा आहे. या कंपनीला १५ वर्षात तब्बल ४२० कोटीपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. वेळोवेळी होणारी वीज दरवाढ पाहता ही रक्कम ७०० ते ८०० कोटींवर जाणार असून, पालिकेला मोठा अर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने हा करार रद्द करावा व ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे युवानेते पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केली.

पवार म्हणाले, महापालिकेच्या एलईडी प्रकल्पासाठी कंपनीने केवळ १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी कंपनी सुमारे ५ कोटी २५ हजार रुपये खर्च करणार आहे. मात्र, यातून कंपनी वर्षाला तब्बल २८ कोटींचे उत्पन्न मिळविणार आहे. गेल्या तीन वर्षातील कंपनीचे बिल १०८ कोटी रुपये झाले असून, यातील ५० कोटी रुपये कंपनीला पालिकेने दिले आहेत. उर्वरित ५४ कोटी रुपये कंपनी मागत आहे. महावितरणच्या आजच्या दराप्रमाणे कंपनी १५ वर्षांत सव्वाचारशे कोटी रुपये मिळवणार आहे.

१५ वर्षांत होणारी वीज दरवाढ पाहता कंपनीला ७०० ते ८०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेने हा करार रद्द केला, तर कंपनीला १,८०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या बिलावरील जीएसटीही महापालिकाच भरणार आहे. त्यामुळे हा करार महापालिकेची लूट करणारा असल्याचा आरोप पवार यांनी केला.

'त्याच' लोकांचा सहभाग ?

कवलापूर विमानतळाची जागा हडप करणारे, जकात ठेक्यात लवाद नेमणारेच समुद्रा कंपनीच्या मागे असल्याचा संशय आहे. याबाबत माहिती घेत असून, लवकरच त्यांची नावे उघड करण्यात येतील, असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipality faces 700 crore loss due to LED project.

Web Summary : BJP's Prithviraj Pawar alleges Sangli Municipality's LED project contract favors the company, costing it ₹700 crores. He demands contract cancellation and ED investigation, citing inflated bills and suspect involvement.