शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात

By admin | Updated: September 15, 2014 00:02 IST

निवडणूक प्रक्रिया शांततेत करण्यास मदत केली

सांगली जिल्ह्यात सभापती, उपसभापतींच्या निवडी मोठ्या जल्लोषात पार पडल्या. यावेळी विरोधकांनी काही ठिकाणी मागे पाऊल घेत अखेर निवडीला साथ देत, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत करण्यास मदत केली. वैशाली माळी बनल्या खानापूरच्या सभापतीसुहास बाबर उपसभापती : बिनविरोध निवड बैठकीत नावे निश्चितखानापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व ७ सदस्यांची पक्षनिरीक्षक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी सौ. माळी व उपसभापती पदासाठी बाबर यांची नावे निश्चित झाली. त्याप्रमाणे बैठकीत इतिवृत्त तयार करून सदस्यांनी या दोघांना मतदान करण्याबाबत पक्षनिरीक्षक सुनील पाटील यांनी पक्षादेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी सांगितले.भाळवणीत जल्लोष...खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपती सौ. वैशाली माळी यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याचे वृत्त भाळवणी गावात समजताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. सौ. माळी या भाळवणी गावच्या स्नुषा असून, त्यांना दुसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली आहे. तालुक्याच्या विभाजनापूर्वी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व माजी आ. अनिल बाबर यांना सभापती पदाची दोनवेळा संधी मिळाली होती. त्यानंतर आता उच्चशिक्षित असलेल्या सौ. माळी यांना सभापतीपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. जत पंचायत समितीवर जगतापांचेच वर्चस्वसभापतीपदी लक्ष्मी मासाळ : उपसभापतीपदी बिरदादा जहागीरदारफूट पाडण्याचा प्रयत्नतालुक्याचे नेते विलासराव जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीमधील सदस्यांत फूट पाडून काँग्रेसचा सभापती करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु येथील सदस्यांनी त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. या निकालामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांना चपराक बसली आहे. पलूसच्या सभापतीपदी विजय कांबळे बिनविरोधकडेगावच्या सभापतीपदी लता महाडिक यांची निवडउपसभापती मुळीक : कार्यकर्त्यांचा जल्लोषचंद्रकांत पाटील शिराळ्याचे सभापतीनिवडी बिनविरोध : सम्राटसिंह नाईक उपसभापतीसर्वांना न्याय..!पहिल्या टप्प्यात शिराळा तालुक्याच्या उत्तर विभागातील शारदाताई घारगे, त्यानंतर पश्चिम विभागातील शारदाताई पाटील यांना सभापती पदाची संधी मिळाली. आता सभापती पदाची संधी तालुक्याच्या दक्षिण भागातील सागाव गणाला देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळाल्याची भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे.मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी दिलीप बुरसेउपसभापतीपदी तृप्ती पाटील : विरोधकांची माघारतेजश्री चिंचकर यांना तीव्र विरोध उपसभापती पदासाठी सत्ताधारी गटाचे विद्यमान उपसभापती माणिक चौधरी, बाबासाहेब कांबळे, जयश्री कब्बुरे, तेजश्री चिंचकर व तृप्ती पाटील हे इच्छुक होते. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे निवडीचा तिढा वाढला होता. ऐनवेळी उपसभापती पदासाठी तेजश्री चिंचकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या दहा सदस्यांनी नेते मदन पाटील यांची भेट घेऊन चिंचकर यांना तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे निर्णय बदलून उपसभापती पदासाठी बुधगावच्या तृप्ती पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. विरोध डावलून चिंचकर यांच्या नावाला पसंती देण्याचा प्रयत्न झाला असता, तर बंडखोरी होण्याची शक्यता होती. ‘कवठेमहांकाळ’मध्ये निवडी बिनविरोधवैशाली पाटील सभापती : कोळेकर उपसभापतीस्त्रीमध्ये नम्रता हवी : रामतीर्थकरइस्लामपूर : चांगल्या स्त्रीमध्ये नम्रता, सामंजस्य, सहनशीलता व विनयशीलता असायला हवी. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅड. रामतीर्थकर यांचे ‘मुलींची जीवनशैली, धर्म जागृती व संस्कार प्रसारण’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या पुढे म्हणाल्या, मुलींनी समाजात खंबीरपणे व ताठ मानेने उभे राहिले पाहिजे. शिक्षणातून समाजप्रबोधन केले पाहिजे. भारतीय संस्कृतीत ‘आई’ला अनन्य महत्त्व आहे. प्राचार्य महेश जोशी यांनी स्वागत केले. वर्षा पाटील, अनुजा तोडकर यांनी संयोजन केले. उपप्राचार्य सी. बी. पाटील व शिक्षक उपस्थित होते. स्वप्नाली साळुंखे यांनी आभार मानले. (वार्ताहर)