शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहराला वादळी पावसाचा तडाखा; गारांचा वर्षाव, झाडांच्या फांद्या कोसळल्या, वीजपुरवठा झाला खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:44 IST

वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने तब्बल तासभर हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की, शहरातील अनेक भागांत झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे सांगलीतील कॉलेज कॉर्नर, अमराई परिसर, घनश्याम नगर, चिंतामणीनगरसह उपनगरांतील वीजपुरवठा खंडित झाला. गारांचा वर्षाव सांगलीकरांनी अनुभवला. सुमारे तासभर वीज नसल्याने अनेक भाग अंधारात होते. वीज वितरण यंत्रणेकडून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नुकसानही झाले. सुदैवाने जीवितहानीची कोणतीही घटना घडली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. हवामानातील अचानक बदलामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Hit by Storm: Hail, Power Outages, Trees Damaged

Web Summary : A sudden storm with hail struck Sangli, Miraj, and Kupwad, disrupting power and damaging trees. Residents experienced an hour-long blackout. While the rain offered relief from the heat, officials urge caution due to unpredictable weather. No casualties were reported.