Sangli Accident News: एरंडोलीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दुचाकीवरून घराकडे जाताना काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:43 IST2025-12-15T12:43:18+5:302025-12-15T12:43:58+5:30
उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला

Sangli Accident News: एरंडोलीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दुचाकीवरून घराकडे जाताना काळाचा घाला
मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे मिरज–सलगरे रस्त्यावर हनुमान हॉटेलजवळ शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. इलाही हबीब इनामदार व संजय रघुनाथ कदम (रा. एरंडोली) अशी मृतांची नावे आहेत.
एरंडोली येथील आठवडा बाजार आटोपून शनिवारी इलाही इनामदार व संजय कदम हे दोघे रात्री मोटारसायकलवरून हनुमान नगर येथे आपल्या घरी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात इलाही इनामदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय कदम हे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मिरज येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.