शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेत पस्तीस कोटीचा घोटाळा

By admin | Updated: September 28, 2015 23:51 IST

गौतम पवार : गाडगीळांनी चौकशी लावावीच

सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या निधीतून महापालिका हद्दीत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली असून जुन्या लोखंडी व बिडाच्या पाईपची ठेकेदार व अधिकाऱ्यांनी परस्परच विल्हेवाट लावली आहे. यात सुमारे ३० ते ३५ कोटीचा घोटाळा झाला असून आमदार सुधीर गाडगीळ यांनी या प्रकरणाचीही चौकशी लावावी, असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले. या कामाचा ठेका भाजप पदाधिकाऱ्याच्या बगलबच्च्यांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. पवार म्हणाले की, पेयजल योजनेतून वारणा उद्भव व सुजल निर्मलअंतर्गत महापालिकेला १२५ कोटीचा निधी मिळाला होता. या निधीतून विविध कामे करण्यात आली. तत्कालीन उपमहापौर व भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या बगलबच्च्यांनी पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतला होता. त्यात नवीन वाहिन्या टाकताना जुन्या वाहिन्या काढण्यात आला. त्यातील लोखंडी व बिडाच्या पाईपची ठेकेदाराने परस्पर विल्हेवाट लावली आहे. त्यातून महापालिकेला ३० ते ३५ कोटीचा फटका बसला आहे. यात अधिकारीही सामील आहेत. पदाधिकाऱ्याला जाब विचारला होता. तसेच माजी आ. संभाजी पवार यांनी विधिमंडळातही चौकशीची मागणी केली होती. भानगडीमुळेच त्यांचा राजीनामा घेतल्याचेही ते म्हणाले. आमदार, खासदारांनी महापालिकेच्या कारभाराबाबत डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप आम्ही केला, तेव्हा आमदार सुधीर गाडगीळ यांना जाग आली. त्यांनी २००८ ते २०१५ या कालावधीतील कामकाजाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांना महापालिकेत पाचशे कोटीचा घोटाळा दिसला. या लेखापरीक्षणात भाजप पदाधिकाऱ्याच्या घोटाळ्याचीही चौकशी होणार का? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)