शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहिणी’चा पेरा अन् मोत्याचा तुरा..!

By admin | Updated: June 1, 2015 00:20 IST

शिराळा तालुक्यातील स्थिती : खरिपाच्या पेरणीसाठी मशागती जोमाने सुरू

विकास शहा - शिराळा -‘रोहिणी’चा पेरा अन् मोत्याचा तुरा’ अशी बळीराजाची म्हण आहे. वळिवाच्या पावसानंतर मशागती पूर्ण होऊन रोहिणी नक्षत्रात पावसाळी पेरणी व्हावी, अशी बळीराजाची अपेक्षा असते. सध्या शिराळा तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतात मशागतीची कामे गतीने सुरू आहेत. तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागामध्ये धूळवाफेवरील भात पेरणीलाही गती आली आहे. १९ मेपासून पेरण्या सुरू झाल्या आहेत. संपूर्ण शिवार गर्दीने फुलून गेले आहे.तालुक्यात काही ठिकाणी वळीव पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी जोराचा वळीव पाऊस पडलेला नाही. जेथे हा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे, तेथे मशागतीच्या कामाला जोर दिसून येत आहे. अलीकडच्या काळात बैलजोडीचे प्रमाण कमी झाल्याने छोट्या—मोठ्या ट्रॅक्टरने शेतात मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टरने मशागत करून हाताने कुरी ओढून भात पिकाची पेरणी केली जात आहे.मे महिना संपला तरी उन्हाचा तडाखा वाढतच आहे. त्यामुळे सकाळी ६ ते १२ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शेतात शेतकरी काम करताना दिसत आहेत. उसाच्या लागणी, खोडवी फोडणे, शेतात बांध घालणे, तालुक्यात भात पिकाचे प्रमाण मोठे असल्याने जमिनीच्या लांबी, रुंदीवर पावसाचे पाणी साठून राहण्यासाठी बांध घातले जात आहेत. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहते. त्याचबरोबर उगवणीनंतर मशागतीला अडथळा येऊ नये म्हणून गतवेळच्या पिकाचे सड, घाण वेचणे ही कामेही गतीने सुरू आहेत.शिराळा तालुक्यात खरीप पेरणीची तयारी पश्चिम व उत्तर भागात अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र पूर्व भागात अजूनही पेरणीपूर्व मशागतीला म्हणावा असा वेग आलेला नाही. गुढे, पाचगणी, त्याचबरोबर मेणी खोरा, उत्तर भागातील वाकुर्डे, शिरशी, धामवडे आदी परिसरामध्ये धूळवाफेवरील पेरणी गतीने सुरु असून काही दिवसात भात पेरणीची कामे पूर्ण होतील.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३ हजार ४१७ हेक्टर असून त्यापैकी पिकाखालील क्षेत्र ३७ हजार ८५२ हेक्टर आहे. त्यापैकी यावर्षी सुमारे २९ हजार १३0 हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामासाठी चालूवर्षी सोयाबीन बियाणाचा काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. मात्र तालुका कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरासाठी प्रात्यक्षिक सुरु केले आहे. त्यामुळे घरगुती बियाणांचा चालूवर्षी मोठा वापर होणार आहे. खरिपाच्या हंगामासाठी खतांचा मात्र मुबलक साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे.मजुरांचा तुटवडातालुक्यात एकाचवेळी सर्वत्र खरिपाच्या हंगामाचे वेध सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. ज्यादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना चालूवर्षी चांगलाच बसत आहे. यंदा ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रशिराळा तालुक्यात चालूवर्षी २९ हजार १३0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये भात १३ हजार ६१३ हेक्टर, ज्वारी २ हजार २0५, मका १ हजार २६२, नाचणी ६७, तर तृणधान्ये ६0, भुईमूग ३ हजार १३३, सोयाबीन २ हजार ५00 हेक्टर आदी बियाणांच्या पेरण्या बाकी क्षेत्रामध्ये होणार असल्याची शक्यता आहे.तालुकास्तरावर बियाणे, खते, कीटकनाशके गुणवत्ता नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. खरिपासाठी सोयाबीन बियाणांची काही प्रमाणात कमतरता भासणार असली तरी, शेतकऱ्यांकडे असणाऱ्या बियाणांची प्रत तपासून त्याबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कृषी खात्यामार्फत सुरु आहे. त्याचबरोबर बियाणे व रासायनिक खतामधील भेसळ रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- भगवानराव माने, शिराळा तालुका कृषी अधिकारी.