शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेहरणाक्षकरांना पठ्ठे बापूरावांचा पडला विसर

By admin | Updated: November 27, 2015 00:42 IST

जन्मगावीच उपेक्षा : ११ नोव्हेंबररोजी जयंती कोणीही साजरी केली नाही

ताकारी : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) हे शीघ्रकवी पठ्ठे बापूराव यांचे जन्मगाव. त्यांच्याच जन्मगावी त्यांची जयंती साजरी न झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.श्रीधर कृष्ण कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरेहरणाक्ष येथे झाला. ११ नोव्हेंबर ही त्यांची जयंती. पण गावातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळे, वाचनालय तसेच त्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्या विकास मंडळाच्या पठ्ठे बापूराव विद्यालयातही त्यांची जयंती साजरी करण्याचे स्वारस्य कोणीही दाखवले नाही.प्रत्येकवर्षी पठ्ठे बापूराव यांची जयंती गावामध्ये साजरी केली जाते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज त्यांच्याच गावात पठ्ठे बापूराव उपेक्षित असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात अनेक थोर, महान पुरुष, साहित्यिक, समाजसुधारक यांची जयंती साजरी केली जाते. परंतु आपल्याच गावातील एका ज्येष्ठ साहित्यिकाची जयंती साजरी करण्याचे भान का राहिले नाही?, असा सवाल ग्रामस्थांकडून सध्या उपस्थित होत आहे.रेठरेहरणाक्ष जि. प. मतदार संघातील सदस्या सौ. सुनीता वाकळे या रेठरेहरणाक्ष गावच्याच आहेत. विशेष म्हणजे त्या पठ्ठे बापूराव यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्यालयात शिक्षिका आहेत. या विद्यालयातही त्यांची जयंती साजरी झाली नाही, हे विशेष. (वार्ताहर)कोण, काय म्हणाले?११ नोव्हेंबरला दिवाळी होती. सार्वजनिक सुट्टी असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत पठ्ठे बापूराव यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी अनवधानाने राहून गेले. यापुढे याची दक्षता घेऊन असे होणार नाही, याची खबरदारी घऊ.- जे. डी. मोरे, सरपंच, रेठरेहरणाक्षदेश व महाराष्ट्रातील थोर महापुरुष, साहित्यिक यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देणे गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होऊन प्रोत्साहन मिळते. पठ्ठे बापूरावांनी तमाशाच्या माध्यमातून काव्यरचना करून समाज सुधारण्याचे काम केले.- रंगरावबापू पाटील, ग्रामीण कथाकार, कामेरी