शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

कडेगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. कडेगाव शहर व तालुक्यातही सकाळी सातपासून ...

कडेगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. कडेगाव शहर व तालुक्यातही सकाळी सातपासून रात्री आठपर्यंत अत्यावश्यक सेवा व प्रशासकीय सूचनांप्रमाणे परवानगी असलेली दुकाने उघडी असतात व अन्य सर्व दुकाने बंद असतात. येथे मिनी लॉकडाऊनला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र जी दुकाने बंद आहेत, त्या व्यावसायिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

तालुक्यात सायंकाळी आठनंतर शुकशुकाट असतो. बाजारपेठेतही एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक दिसत नाहीत. कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व चिंचणीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत तालुक्यातील व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यास सहकार्य केले आहे. रात्री आठनंतर शहरात ठिकठिकाणी उभे राहून पोलीस रस्त्यावरील लोकांना बाहेर निघण्याचे कारण विचारत आहेत. शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

चौकट

पाडव्यापर्यंत दुकानांना परवानगी द्या

मंगळवारी गुढीपाडवा आहे. या मुहूर्तावर नवीन कपडे, गाड्या किंवा नवीन वस्तू खरेदी होते. मागील वर्षीच्या गुढीपाडव्यालाच लॉकडाऊन होता. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने घालून दिलेले नियम आणि सूचनांचे पालन करू, परंतु गुढीपाडव्यापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी करत आहेत.