शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिकेच्या ‘नो व्हेईकल डे’ला प्रतिसाद

By admin | Updated: April 23, 2015 00:12 IST

प्रत्येक मंगळवारचा संकल्प : नगरपालिकेकडून नागरिकांना सहभागासाठी आवाहन

इस्लामपूर : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या नो व्हेईकल डे उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व प्रदूषण कमी करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी केले.पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व इंधन बचत यांचा विचार करुन इस्लामपूर नगरपालिकेने आयोजित केलेल्या, आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर मंगळवारी हा दिवस पाळला जाणार आहे. सकाळी ९ वाजता वाळवा पंचायत समितीपासून नगरपालिकेपर्यंत सायकल रॅली व पदयात्रा काढून पालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.
सांगलीहून सकाळी सहा वाजता सायकलवरून निघून इस्लामपुरात रॅलीत सहभागी झालेले गोविंदराव परांजपे, ८५ वर्षे वयाचे शामराव कोळी, वीरेंद्र राजमाने, विश्वासराव पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही रॅलीत सहभाग घेतला. शहर राष्ट्रवादीच्यावतीने अध्यक्ष शहाजी पाटील यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणाले, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात इस्लामपूर नगरपालिका नेहमीच आघाडीवर आहे. शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. पंचायत समिती, शिराळा नाका, गांधी चौक, यल्लम्मा चौक ते नगरपालिका अशी रॅली निघाली.
यावेळी इंजिनिअर्स असोसिएशनचे अनिल पाटील, डॉ. अमृत पाटील, संजय कबुरे, नगरसेवक शहाजी पाटील, महाडिक युवा शक्तीचे सोमनाथ फल्ले, माजी नगरसेवक आयुब हवलदार, भूषण कारंजकर, नारायण पाटोळे, आनंदा कांबळे, आर. आर. खांबे, एस. एम. कांबळे, साहेबराव जाधव, प्रकाश सवाईराम यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

इस्लामपूर पालिकेच्या ‘नो व्हेईकल डे’ला प्रतिसाद
प्रत्येक मंगळवारचा संकल्प : नगरपालिकेकडून नागरिकांना सहभागासाठी आवाहन
इस्लामपूर : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या नो व्हेईकल डे उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व प्रदूषण कमी करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी केले.
पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व इंधन बचत यांचा विचार करुन इस्लामपूर नगरपालिकेने आयोजित केलेल्या, आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर मंगळवारी हा दिवस पाळला जाणार आहे. सकाळी ९ वाजता वाळवा पंचायत समितीपासून नगरपालिकेपर्यंत सायकल रॅली व पदयात्रा काढून पालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.