शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांकडील जलसंपदा खाते काढून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना होण्याबाबत शंका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना होण्याबाबत शंका वाटते. त्यामुळे जलसंपदा खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घ्यावे. जयंतरावांना सांस्कृतिक कार्यमंत्री करावे, अशी मागणी करीत सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पूरग्रस्तांसह निदर्शने केली.

येथील कृष्णा नदीकाठी टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. महापूर संकट, कोरोना संकटकाळात जिल्हा प्रशासन, राज्य शासनाकडून लोकांचे जगणे अधिक खडतर होत असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी निदर्शने केली. ‘कोरोनात अपयशी, महापुरात तोंडघशी’ अशा घोषणा देण्यात आल्या.

पृथ्वीराज पवार म्हणाले, २०१९ च्या निकषांनुसार पूरग्रस्तांना मदतीचे धोरण राबवायला हवे होते. मात्र या ठिकाणची स्थिती मंत्रिमंडळापर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. मंत्री अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची जिल्ह्यात दयनीय अवस्था आहे. महापुराने जगणे असह्य केले आहे. दोन्ही संकटांत पालकमंत्र्यांचे चुकलेले नियोजन कारणीभूत ठरले आहे. या संकटाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. त्याउलट अभिनंदन, सत्कार होताहेत. लोकांच्या जखमेवर मीठ चोळले जातेय. महापूर रोखण्याच्या विषयात कागदी विमाने हवेत उडविली जात आहेत. नदीला भिंत बांधण्याआधी इस्लामपूर-सांगली रस्ता करावा. पंचगंगा नदी वळविण्याआधी शेरीनाल्याचा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.

यावेळी रेखा पाटील, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, गोपाळ पवार, रवी वाडवणे, मीरा चौगुले, जयश्री भोसले, शाबिरा शेख, शुभम चव्हाण, राहुल बोळाज, आदी उपस्थित होते.