शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘अष्टलिंग’च्या ठेवी मिळाल्या

By admin | Updated: October 17, 2014 22:16 IST

ठेवीदारांना दिलासा : प्रशासक, अवसायक, बचाव समितीच्या प्रयत्नांना यश

सुरेंद्र शिराळकर - आष्टा -येथील अष्टलिंग नागरी सह. पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. संस्थेत साडेपाच कोटीच्या ठेवी होत्या. २00३ अखेर त्या व्याजासह ९ ते १0 कोटी झाल्या. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून अनेक तीव्र आंदोलने झाली. प्रशासक मंडळ, अवसायक मंडळ, अष्टलिंग बचाव समिती यांनी केलेल्या प्रयत्नामुळे १९ वर्षात ठेवीदारांना साडेआठ ते नऊ कोटीच्या ठेवी परत दिल्या आहेत. अवसायक मंडळाने गुढीपाडवा व दीपावलीस संस्थेसमोर आठ दिवस अगोदर बोर्ड लावून हजारो ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणले जात असतानाच, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात सहकाराची बीजे रोवली गेली. मोठ्या बँकांसह, पतसंस्था, सोसायट्यांचे जाळे विणले गेले. आष्ट्यात सहकार वाढीस लागला असतानाच १९९५ मध्ये अष्टलिंग नागरी सह. पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी अडीच कोटीचा अपहार करीत सभासदांच्या विश्वासाला तडा दिला.हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात म्हणून प्रखर आंदोलन केले. शासनाचे संचालक मंडळ बरखास्त करीत ठेवीदार बचाव समिती सदस्यांचे प्रशासक मंडळ नेले. २00१ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. मात्र हे संचालक अपहारकर्त्या संचालकांनाच मदत करीत असल्याचे सिध्द झाल्याने संचालकांनी राजीनामा दिला.२00२ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन संचालक मंडळ अस्तित्वात आले. मात्र या संचालकांनी मृत ठेवीदारांचे खोटे अंगठे उठवून पैसे घेतल्याचे सिध्द झाले. ठेवीदारांनी ८३ दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर ३0 सप्टेंबर २00३ ला संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी संस्था अवसायनात काढली व अवसायक म्हणून वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांनीही कर्जदारांना बेकायदेशीर सूट दिल्याने त्यांची बदली करण्यात आली.यानंतर सहाय्यक रजिस्ट्रार, इस्लामपूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करुन अष्टलिंग बचाव समितीचा एक प्रतिनिधी अवसायक मदतनीस म्हणून नेमण्यात आला. राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीवर मर्यादा येऊ लागल्या. अखेर जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेवर अवसायक मंडळ नेमले. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक उपनिबंधक, इस्लामपूर सचिन गायकवाड यांची, तर अष्टलिंग बचाव समितीचे अमोल पाटील, राजाराम पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. २0१0 ते २0१४ अखेर अवसायक यांनी ४५ लाख रुपये ठेवीदारांना परत दिले आहेत.१९९५ पासून ९ ते १0 कोटींच्या ठेवींपैकी आठ ते साडेआठ कोटीच्या ठेवी परत करण्यात अवसायकांना यश मिळाले आहे. गेली १९ वर्षे अमोल पाटील यांनी प्रशासक मंडळ, मदतनीस, विशेष वसुली अधिकारी, अवसायक मंडळ याठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून विनामोबदला काम केले आहे.जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपनिबंधक सचिन गायकवाड, अमोल पाटील, राजाराम पवार यांनी ठेवीदारांच्या लाखोंच्या ठेवी पुन्हा मिळवून देत त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. हजारो ठेवीदारांनी मुला—मुलींचे शिक्षण, नोकरी, लग्न, घरासाठी ठेवलेले पैसे परत देऊन, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले.