शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीच्या पंखांना बळ मिळालेच नाही!

By admin | Updated: May 1, 2015 00:15 IST

सांगली शहराच्या प्रगतीला पंख देणाऱ्या पायाभूत सुविधांबाबतच

सांगली जिल्ह्यात आजवर राजकीय, प्रशासकीय स्तरावर उदासीनता दिसून आली. त्यामुळेच सांगलीच्या स्थापनेनंतर मागील ५५ वर्षांत पायाभूत सुविधांबाबत अजूनही मागासलेपण दूर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग कासवगतीने सुरू आहे. कोणत्याही शहराची, जिल्ह्याची प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. महामार्ग, रेल व्यवस्था, हवाई वाहतूक, जलवाहतूक अशा गोष्टींवर अवलंबून असते. पायाभूत सुविधा असतील, तर औद्योगिकीकरण झपाट्याने वाढते, औद्योगिकीकरण वाढले की रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध झाला की त्या शहराची आपोआपच आर्थिक प्रगती होते. हे सूत्र सांगलीला अजून तरी लाभलेले नाही. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९२ हजार ८५१ किलोमीटर इतके आहे. एकूण महामार्गांच्या किलोमीटरशी तुलना करता जिल्ह्यात असणारे राष्ट्रीय महामार्गाचे २९.५७ किलोमीटरचे जाळे हे अत्यंत कमी म्हणजे केवळ ०.०३ टक्के इतके आहे. यावरूनच सांगली जिल्ह्याच्या प्रगतीत राष्ट्रीय महामार्गाची किती मोठी उणीव आहे, याची कल्पना कोणालाही येऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग हा सर्वांगीण विकासाचा महामार्ग मानला जातो. तरीही याबाबतची उदासीनता दिसून येते. राष्ट्रीय महामार्गांमुळे सांगली जिल्ह्यालगत असणाऱ्या कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना प्रगतीचे पंख लाभले. महामार्गाची उपलब्धता असल्याने याठिकाणी औद्योगिकरण, व्यापारीकरण, रोजगार अशा गोष्टींना चालना मिळाली. दुसरीकडे याच कमतरतेमुळे सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यापार व रोजगार यांची घुसमट सुरू झाली आहे. व्यापार, उद्योग वाढीला पोषक वातावरण असूनही केवळ दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्याच्या प्रगतीला खीळ बसली आहे. राज्य महामार्गांची अवस्थाही फारशी चांगली नाही. राज्य महामार्गही अरुंद असल्यामुळे त्याच्या रुंदीकरणासाठी इतक्या वर्षातून आता प्रयत्न सुरू झाले आहेत. तरीही बऱ्याच राज्य मार्गांच्या रुंदीकरणाचे प्रस्तावसुद्धा शासनदरबारी चर्चेला येत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांचा विकास, रुंदीकरण आणि विमानतळ उभारणी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. त्यासाठी राजकीय पातळीवर काही प्रयत्न झालेसुद्धा, परंतु आणखी ताकद लावण्याची गरज आहे. भूसंपादनाचा प्रश्न आल्यानंतर बऱ्याचदा स्थानिक लोकांकडून विरोध होतो. अशावेळी मतदारांची नाराजी स्वीकारण्याची तयारी नसल्याने राजकीय नेते अशा ठिकाणी खचतात. नुकसानभरपाई तातडीने देऊन अशा गोष्टींना विरोध करणारे आणि शासन यामध्ये सुवर्णमध्य काढून विकासाच्या योजना मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. - अविनाश कोळी