प्राथमिक शिक्षक बँकेला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:41+5:302021-03-08T04:24:41+5:30

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेला अविज पब्लिकेशन, कोल्हापूरकडून ‘बँको ब्लू रिबन २०२०’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती ...

Prize to Primary Teacher Bank | प्राथमिक शिक्षक बँकेला पुरस्कार

प्राथमिक शिक्षक बँकेला पुरस्कार

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेला अविज पब्लिकेशन, कोल्हापूरकडून ‘बँको ब्लू रिबन २०२०’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती अध्यक्ष सुनील गुरव यांनी दिली.

गुरव म्हणाले की, म्हैसूर येथे १० मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. बँकेकडे ५२० कोटींच्या ठेवी असून ३६६ कोटींची कर्जे आहेत. अत्याधुनिक संगणक प्रणालीच्या माध्यमातून सभासद व ठेवीदार यांना सेवा पुरविली आहे. सामाजिक कार्यातही बँक अग्रभागी आहे. शिक्षकांचा सत्कार, महिला सभासदांसाठी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार असे उपक्रमही राबविले जात आहेत. महापूर, भूकंप, दुष्काळ, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळातही बँकेने सामाजिक बांधीलकी जपली आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा व रिझर्व्ह बँकेच्या नियम व कायद्याचे तंतोतंत पालन करणारी व १०० टक्के वसुली असणारी पगारदार नोकरांची एक अग्रेसर बँक म्हणून तिने नावलौकिक मिळविला आहे. या पुरस्काराने बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचेही गुरव यांनी सांगितले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले, राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसन पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे उपस्थित होते.

Web Title: Prize to Primary Teacher Bank