शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात परप्रांतीय शस्त्र तस्करास अटक

By admin | Updated: May 14, 2015 23:55 IST

पोलिसांची कारवाई : पिस्तुलासह आंतरराष्ट्रीय कंपनी बनावटीचे शिक्के, साचे जप्त

विटा : उत्तर प्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल व सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शिक्के व साचे विटा येथे विक्री करण्यास आलेल्या वीरेंद्रसिंंह लाखनसिंह सेंगर (वय ४०, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यास विटा पोलीस पथकाने छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, दुबई, स्वीत्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावे तयार करण्यात आलेले सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे तीन शिक्के व तीन साचे असा एकूण ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी दुपारी विटा बस स्थानकात पोलिसांनी ही कारवाई केली. कानपूर (उत्तर प्रदेश) येथून एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल व सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय शिक्के आणि साचे घेऊन येणार असल्याची माहिती विट्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक अनिल मिसाळ, सलीम मुल्ला, विशाल पवार, नाना पाटील, अभिजित वाघमोडे, नंदकुमार गुरव, शिवाजी माने, महादेव शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने विटा बसस्थानकात सापळा लावला. त्यावेळी बस स्थानकातील फलाट क्र. ३ वर वीरेंद्रसिंह सेंगर हा संशयितरित्या थांबलेला आढळला. साध्या वेशातील पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ रोख ९०० रुपये व पिशवीत गावठी बनावटीचे पिस्टल, दुबईच्या कोलटी कंपनी, युबीएस, युनियन बॅँक स्वीत्झर्लंड या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीचे सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे शिक्के व तीन साचे असा सुमारे ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वीरेंद्रसिंह सेंगर याच्याविरुध्द गुन्हा दाखल असून, पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)शस्त्रांची मोठी तस्करी उघडकीस येणारउत्तर प्रदेश येथील कानपुरातून गावठी बनावटीचे पिस्टल व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या, सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणाऱ्या बनावट शिक्क्यांची विक्री करण्यासाठी वीरेंद्रसिंह सेंगर हा विट्यात आला होता. तो ग्राहकाच्या शोधात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा संशयित शस्त्रांची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत असण्याची शक्यता आहे, असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.