शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्या रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहीम

By admin | Updated: July 19, 2015 23:38 IST

पोलीसप्रमुखांचा निर्णय : पोलिसांची यंत्रणा आणखी सतर्क ठेवण्यासाठी प्रयत्न

सांगली : जिल्ह्यातील वाटमारी, चोरी, घरफोडी हे मालमत्ताविषयक गुन्हे रोखण्यासाठी प्रबोधनात्मक मोहीम उघडण्याचा निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी घेतला आहे. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. रात्र आणि दिवस अशा दोन सत्रात गस्त घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणखी सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनीही खबरदारी घेतल्यास चोरीच्या घटना टळू शकतात, असे स्पष्ट मत फुलारी यांनी व्यक्त केले आहे.वाळवा, शिराळा व खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातही आठवड्यात दोन आलिशान बंगले फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात गावकरी गस्त घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वाढत्या चोऱ्यांचा प्रश्न आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागली. गतवर्षीच्या तुलनेत चोऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी, गेल्या महिन्याभरात सातत्याने चोरीचे गुन्हे घडतच आहेत. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील व परराज्यातील गुन्हेगारांनी येथे शिरकाव केला आहे. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. दररोज गस्त सुरु असूनही अद्याप संशयित कोणीही सापडलेले नाही. (प्रतिनिधी) (समाप्त)मदत घेऊनच गस्त घालावीग्रामीण गस्त घालणारे गावकऱ्यांकडून चोर समजूृन संशयावरुन मारहाण केली जात आहे. पण पोलीस चौकशीत पकडलेला संशयित चोर नसल्याचे निष्पन्न होत आहे. यासंदर्भात फुलारी म्हणाले, गस्त घालताना गावकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस व गावच्या पोलीस पाटीलची मदत घ्यावी. संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मारहाणीतून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत जून, जुलैमध्ये चोऱ्यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. चोरांचा धुमाकूळ सुरू असल्याने लोक गस्त घालत असले तरी, आमचे पोलीसही त्यांच्या मदतीसाठी आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा सक्षम आहे. चोरीचे गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्कता बाळगायला हवी. - सुनील फुलारी, जिल्हा पोलीसप्रमुख