शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

सांगली : सत्तास्थानी असलेल्या भाजप व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. भाजप ...

सांगली : सत्तास्थानी असलेल्या भाजप व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. भाजप संख्याबळावर हे पद आपल्याकडेच राखण्याचा, तर चमत्कार करून हे पद आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आघाडीकडून सुरू आहे. त्याची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रविवारी सांगलीत दाखल होणार आहेत.

महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी २३ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर गीता सुतार यांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. महापौरपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. सांगली महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे, भाजपचे संख्याबळ अपक्ष धरून ४३ इतके आहेत, तर विरोधी काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. सत्ताधारी भाजपकडून युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अजिंक्य पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ऐनवेळी नाराजीचा सामना करावा लागू नये म्हणून भाजपची कोअर कमिटी चिंतेत पडली आहे. सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजपाला प्रशासनाशी मिळते-जुळते घ्यावे लागत असल्याने सदस्यही नाराज आहेत.

राष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण हे इच्छुक आहेत. काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर राष्ट्रवादीची भूमिका अवलंबून आहे. काँग्रेस चमत्काराच्या प्रतीक्षेत आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाला महापौरपदाची संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीतही अतंर्गत मतभेद आहेत.

महापौर निवडणूक जाहीर होताच सर्व पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील हे रविवारी सांगलीत नगरसेवकांच्या बैठका घेणार आहेत. दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. या दिग्गज नेत्यांच्या बैठकांमध्ये महापौर उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

चौकट

आघाडीत सूर जुळेनात

काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे महापौरपदाची निवडणूक लढविणार असली तरी महापौरपदाचा उमेदवार कोणाचा यावरून सूर जुळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे सूर जुळले नाहीत, तर भाजपचा मार्ग सुकर होणार आहे.