आटपाडीतून पळविलेली चार लाखांची रक्कम पोलिसांकडून परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:41+5:302021-04-11T04:26:41+5:30

आटपाडी : येथून करगणी येथील बँकेत रक्कम जमा करण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या मोहन सुखदेव शिंदे (वय ३४, रा. मायक्कानगर, आटपाडी) ...

Police return Rs 4 lakh stolen from Atpadi | आटपाडीतून पळविलेली चार लाखांची रक्कम पोलिसांकडून परत

आटपाडीतून पळविलेली चार लाखांची रक्कम पोलिसांकडून परत

आटपाडी : येथून करगणी येथील बँकेत रक्कम जमा करण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या मोहन सुखदेव शिंदे (वय ३४, रा. मायक्कानगर, आटपाडी) याला मारहाण करून पळविण्यात आलेली चार लाख १० हजारांची रक्कम पोलिसांनी परत दिली. पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी ही रक्कम रेडिएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नागोबा वसंतराव देशमुख यांच्या ताब्यात दिली.

दि. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी आटपाडी येथील विमा कंपनीच्या कार्यालयातील रक्कम करगणी येथील बँकेत जमा करण्यासाठी मोहन शिंदे चालले होते. ते रेडीएंट कंपनीचे कर्मचारी आहेत. या कंपनीकडे रक्कम बँकेत पोहोच करण्याचे काम देण्यात आले आहे. मायाक्कानगर येथील कालव्याजवळ आधीच तीन संशयित उभे होते. त्यांनी मोहन शिंदे यांना बांबूने मारहाण केली. झटापट करून त्यांच्याजवळील पैशाची बॅग पळवून नेली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून संशयितांकडून रक्कम हस्तगत केली. पोलीस निरीक्षक निंभोरे यांनी ही रक्कम ताब्यात दिली.

Web Title: Police return Rs 4 lakh stolen from Atpadi