शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांचा मोर्चा म्हणजे अजबच!

By admin | Updated: August 26, 2015 23:03 IST

पतंगराव कदम : दुष्काळाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

सांगली : केवळ बनवाबनवी आणि फसवाफसवी झाल्याने लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाच मोर्चा म्हणजे अजबच प्रकार आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, शासनाने अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. या घोषणांचा काहीही उपयोग झाला नाही. ‘अच्छे दिन की बुरे दिन’ हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. जशी मोदींची लाट आली होती, तशीच त्यांच्या विरोधातील लाट आता तयार होत आहे. राज्य करावे तर काँग्रेसनेच करावे, असे लोक आता म्हणत आहेत. लोकांचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या घटकपक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येकालाच लाल दिव्याची गाडी हवी आहे. लोक आग्रही असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजकीय पातळीवरही सगळा आनंदच आहे. दुष्काळाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असतानाही, सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. आम्ही दिलेले स्थायी आदेशच पुढे रेटले असते, तरी दुष्काळी भागाला मदत झाली असती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता, तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)दोनच मते विरोधातसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व हमालांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता केवळ दोनच मते विरोधात आहेत. आधुनिकीकरण तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व नवे चेहरे असल्यामुळे स्वच्छ व पारदर्शी कारभार होईल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.