राजारामबापू कारखान्याला पॅशीनेट बिझनेस अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:26+5:302021-04-11T04:25:26+5:30

फोटो- राजारामबापू कारखान्याला ॲनिमल राहत संघटनेने पॅशीनेट बिझनेस अवॉर्ड देऊन पी. आर. पाटील यांचा गौरव केला. यावेळी डॉ. नरेश ...

Passionate Business Award to Rajarambapu Factory | राजारामबापू कारखान्याला पॅशीनेट बिझनेस अवॉर्ड

राजारामबापू कारखान्याला पॅशीनेट बिझनेस अवॉर्ड

फोटो- राजारामबापू कारखान्याला ॲनिमल राहत संघटनेने पॅशीनेट बिझनेस अवॉर्ड देऊन पी. आर. पाटील यांचा गौरव केला. यावेळी डॉ. नरेश उप्रेती व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याने आधुनिकतेची कास धरत उसाची अवजड वाहतूक करण्यासाठी वाहनांचा वापर वाढवून बैलगाड्यांचा वापर पूर्णपणे थांबवत राज्याच्या साखर उद्योगात क्रांतिकारी बदलास सुरुवात केली आहे. यामुळे वाटेगाव शाखेचा पॅशिनेट (दयाळू) बिझनेस अवॉर्ड देऊन ॲनिमल राहत संघटनेने गौरव केला.

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने बैलांवर अधिक ताण पडत असल्यामुळे त्यांचा उपयोग करण्याऐवजी मोटराइज्ड वाहनांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. ॲनिमल राहतचे मुख्य व्ययस्थापक डॉ. नरेश उप्रेती म्हणाले, ॲनिमल राहत द्वारा इतर साखर कारखान्यांनादेखील त्यांच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यास आणि बैलांना कडक उन्हात पाठीवर प्रचंड ताण देणारा भार वाहून नेण्यास भाग पाडणे बंद करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

ते म्हणाले, ॲनिमल राहतने १० वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला यांत्रिकीकरण प्रकल्प आता चांगलाच वेग धरत आहे. त्यामुळे साखर कारखान्यात बैलांना रोज भोगाव्या लागणाऱ्या यातना कमी करण्यास मदत होत आहे. बैलगाडीमालकांना बैलांचा उपयोग करण्याऐवजी मिनी-ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे आणि तसे करताना, त्याच्या राहणीमानात सुधारणा करून बैलांना कष्टातून मुक्त करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

Web Title: Passionate Business Award to Rajarambapu Factory