शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पारावरच्या गप्पा ते माळावरच्या खेपा...

By admin | Updated: October 16, 2014 00:09 IST

विधानसभा निवडणूक : मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्याची चुरस; कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे गोंधळाला ‘चेक’

सांगली : मतदानाचा दिवस अखेर उजाडला... मतदान केंद्र्राच्या आचारसंहितेच्या पांढऱ्या लक्ष्मणरेषा स्पष्टपणे दिसू लागल्या... मतदान केंद्रांवरची सकाळ मतदारांच्या प्रतीक्षेत सुरू झाली. हळूहळू गर्दी वाढेल तशा पारावरच्या गप्पा आणि माळावरच्या मतदारांना आणण्याच्या खेपांना गती आली. सूर्य डोईवर येईपर्यंत संपूर्ण जिल्हाभर निवडणुकीचे वातावरण तापले. चुरस, तणाव, वादावादी आणि थोडासा गोंधळ झाला तरीही, मतदान शांततेत पार पडले आणि प्रशासनाचा जीव भांड्यात (मतदान यंत्रात) पडला. सांगलीत सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. केंद्र्रातील कर्मचाऱ्यांना मतदारांची प्रतीक्षा लागली होती. पक्षीय बुथही सकाळी आठ वाजेपर्यंत रिकामे होते. कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी बुथचा ताबा घेतला. सांगलीत सकाळी ९ वाजेपर्यंत ८ ते १0 टक्के मतदान झाले होते. सांगली शहरातील मतदानाचा हा वेग दिवसभर तसाच राहिला. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदानाचे चित्र वेगळे दिसत होते. शहरात सकाळी निरुत्साह दिसत असतानाच ग्रामीण भागात उत्साहाने मतदानासाठी लोक बाहेर पडताना दिसत होते. कर्नाळ येथे सकाळी साडेनऊ वाजताच पारावरच्या गप्पा रंगल्या होत्या. कुणी बसची वाट पाहत होते, तर कुणी निवडणुकीत काय होणार, याची चर्चा करीत होते. गावाच्या मुख्य चौकात गर्दी होती. या ठिकाणी दहा वाजेपर्यंत २0 टक्केच मतदान झाले होते. तसेच शेजारीच असलेल्या नांद्रे गावात सकाळी दहापर्यंत १0 टक्केच मतदान झाले होते. नांद्रेतील केंद्र सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ओस पडले होते.पलूस-कडेगाव मतदारसंघात सकाळपासूनच चुरस दिसून येत होती. वसगडे येथे साडेदहा वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणीही गावातील मुख्य चौकात राजकीय चर्चा रंगल्या होत्या. तशाच गप्पांचा फड अमणापूर येथेही सुरू होता. सोसायटीच्या कार्याशेजारील इमारतीच्या कट्ट्यावर गावकऱ्यांची गर्दी होती. निवडणुकीत काय होणार, कोणाबद्दल कशी नाराजी आहे, मोदींकडे बघून किती मतदान होणार, याविषयीची चर्चाही रंगली होती. अमणापुरात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३१.९५ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्र रिकामे असले तरी तासागणिक मतदानाचे आकडे वाढत होते. तासगाव - कवठेमहांकाळमध्येही कार्यकर्ते, समर्थकांमधील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. नेत्यांचे समर्थक बुथवर ठाण मांडून बसले होते. (प्रतिनिधी)आधी स्वच्छता, मग मतदानसांगलीच्या खणभाग परिसरात सकाळी नऊ वाजता घंटागाडीवरील काही महिला कर्मचारी कचरा गोळा करण्यात मग्न होत्या. त्यांना मतदान केले का?, असे विचारल्यानंतर त्यांनी ‘आधी स्वच्छता, मग मतदान’, असे मोजकेच उत्तर दिले. आमचं काय घर चालवाया येत्यात व्हय?चिंचणीजवळील एका शेतात काम करणाऱ्या एका दाम्पत्याने नुकतेच मतदान केले होते. गावात काय होणार?, असा सवाल उपस्थित केल्यानंतर ते संतापाने म्हणाले, ‘काय का हुईना. आमचं काय घर चालवाया कुणी येतंय व्हय. मतदान करायचं असतं म्हणून केलं. आता काय व्हायचं ते हुईल.’नवे पोलीस फोर्सजिल्ह्यात नांदे्र, पलूस, अमणापूर, शिरढोण, कवठेमहांकाळ, चिंचणी या ठिकाणी वेगवेगळे पोलीस फोर्स दिसून आले. इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) व पंजाब बॉर्डर विंगचे जवान या ठिकाणी तैनात केले होते. आयटीबीपीचे शंभर, तर पंजाब बॉर्डर विंगचे जवळपास साडे पाचशे जवान तैनात असल्याचे पथकातील जवानांनी सांगितले. अंदाज घेणे मुश्किलअनेक तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय तज्ज्ञांनाही निकालाबाबतचा अंदाज घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मतदानानंतर रात्री सर्वत्र निकालांविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. लॅपटॉप गेला अन मोबाईल आला...लोकसभा निवडणुकीवेळी सांगली जिल्ह्यात बहुतांश बुथवर लॅपटॉपवरून मतदार याद्यांवर नावांचा शोध घेतला जात होता. सांगली शहरात असे चित्र अधिक दिसून आले होते. या सहा महिन्यातच हे चित्र बदलून लॅपटॉपची जागा आता स्मार्ट फोनने घेतली आहे. स्मार्ट फोनवर इंटरनेटच्या माध्यमातून ‘वोटर्स सर्च इंजिन’वर मतदारांच्या नावांचा शोध घेतला जात होता. सांगली शहरातील बहुतांश बुथवर हे चित्र होते. सांगलीतील खणभाग परिसरात अनेक बुथवर कार्यकर्ते मोबाईलवरून मतदारांना त्यांच्या अनुक्रमांकाची, केंद्र क्रमांकाची माहिती देत होते. भिलवडी व परिसरातील काही बुथवर मात्र लॅपटॉप दिसून आला. काही ठिकाणी छापील याद्यांमधूनच जुन्या पद्धतीने मतदारांना माहिती दिली जात होती.