शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य कर्मचारी भरतीची हॅट्ट्रिक

By admin | Updated: December 26, 2014 23:53 IST

तीन संस्था वादात : एकाच महिन्यात उघडकीस आले तीन घोटाळे; पगारापोटी लाखोंचा खर्च

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महापालिका अशा तीन संस्थांच्या बेकायदेशीर भरतीची लक्तरे एकाच महिन्यात वेशीवर टांगली गेली. नियम धाब्यावर बसवून मर्जीतल्या लोकांनाच ‘अर्थपूर्ण’ तडजोडीनंतर नोकऱ्या बहाल करण्यात आल्या. अनेक वर्षे पगारापोटी लाखो रुपये खर्च होईपर्यंत हे घोटाळेही उघडकीस कसे आले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक कर्मचारी भरतीमधील घोटाळे उघडकीस आले. वशिलेबाजी या एकाच पात्रतेच्या आधारे या तिन्ही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. कोणत्याही शासकीय संस्थांमधील भरतीला नियम आहेत. या नियमांचे आधारेच भरती केली जावी, असे अपेक्षित असताना, सर्रास या नियमांना तिलांजली दिली गेली. याची प्रचिती या तीन संस्थांच्या भरती प्रक्रियेने दिली. जिल्हा बँकेतील कर्मचारी भरती तब्बल १२ वर्षांनंतर उजेडात आली. इतकी वर्षे हा प्रकार पडद्याआडच राहिला. सुरुवातीला रोजंदारीवर या लोकांना कामावर घेऊन नंतर कायम करण्याची ही शक्कल अनेक ठिकाणी लढविली जाते. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने २५ लोकांना शिकाऊ शिपाई म्हणून नियमबाह्यरित्या नियुक्त केले. त्यांना नंतर कायमही करण्यात आले. त्याचवेळी संचालक मंडळाने तात्पुरती व्यवस्था म्हणून ७८ लोकांना रोजंदारीवरील शिकाऊ लिपिक व १९ लोकांना रोजंदारीवरील शिपाई या पदांवर घेतले. भरतीसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. लेखी अथवा तोंडी परीक्षा पद्धतीला फाटा देण्यात आला. शासनाने १३0 लिपिकांच्या पदांसाठी परवानगी दिली असताना, बँकेने १३८ लिपिक नियुक्त केले. तेही वशिलेबाजीने. सांगली कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आजी, माजी संचालकांची मुले, नातेवाईकांची अवैधरित्या भरती केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये २१ कर्मचाऱ्यांची आक्षेपार्ह भरती झाली असून, ही भरती सध्या न्यायप्रविष्ट आहे. महापालिकेच्या मानधनावरील कर्मचारी भरतीने तर कहर केला. बोगस कागदपत्रांद्वारे भरती केल्यानंतर अनेक वर्षे या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले. अशावेळी मुकादम, महापालिकेच्या लेखा विभागातील कर्मचारी, कामगार, अधिकारी किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी असतानाही, या गोष्टी घडल्याच कशा?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने आता याप्रकरणी फौजदारी दाखल केली आहे. (प्रतिनिधी)वादातील भरतीजिल्हा बँक - ६0 शिपाई आणि ३५ लिपिकमहापालिका - १३ सफाई कर्मचारीबाजार समिती - २१ कर्मचारी