उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर एकेरी वाहतुकीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:17+5:302021-08-26T04:29:17+5:30

सांगली : वाहतुकीची वाढती कोंडी व त्यामुळे थांबून राहत असलेल्या वाहनांमुळे वर्दळीच्या असलेल्या विश्रामबागहून कुपवाडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळील मार्गावर एकेरी ...

One-way traffic planning on the road near the flyover | उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर एकेरी वाहतुकीचे नियोजन

उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर एकेरी वाहतुकीचे नियोजन

सांगली : वाहतुकीची वाढती कोंडी व त्यामुळे थांबून राहत असलेल्या वाहनांमुळे वर्दळीच्या असलेल्या विश्रामबागहून कुपवाडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळील मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. शनिवार दि. १ पासून प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

पोलीस अधीक्षक गेडाम यांनी याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यावर हरकती, सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. एकेरी वाहतूक करण्यात येणाऱ्या मार्गानुसार विश्रामबाग ते कुपवाड रोड जाणाऱ्या प्रेरणा कॉम्प्लेक्स ते विश्रामबाग रेल्वे फाटकापर्यंतचा पश्चिमेकडील दक्षिण उत्तर बाजू एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे विश्रामबाग चौकातून पुलालगत जाणाऱ्यांना पश्चिमेकडील बाजूने जावे लागणार आहे.

विश्रामबाग रेल्वे फाटक ते कोरे कॉर्नर अपार्टमेंटपर्यंत विश्रामबाग चौकाकडे येणाऱ्या पूर्वेकडील वाहनांसाठी एकेरी मार्ग असणार आहे. दोन्ही मार्गांवरील वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केल्यानंतर वाहन चालक, नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक गेडाम यांनी दिली.

Web Title: One-way traffic planning on the road near the flyover