जुनेखेडला एकास सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:54+5:302021-03-08T04:25:54+5:30

सांगली : जुनेखेड (ता. वाळवा) येथील तरुणास सर्पदंश झाला. अनिल जिजाबा भोईर (वय २४) असे जखमी तरुणाचे नाव असून ...

One snake bite in Junekhed | जुनेखेडला एकास सर्पदंश

जुनेखेडला एकास सर्पदंश

सांगली : जुनेखेड (ता. वाळवा) येथील तरुणास सर्पदंश झाला. अनिल जिजाबा भोईर (वय २४) असे जखमी तरुणाचे नाव असून शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शेतात हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

सांगलीत एकास मारहाण

सांगली : शहरातील आयर्विन पुलावर तरुणास मारहाण करण्यात आली. अकूम इस्माईल शेख (वय ३३, रा. हाडको कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

कुकटोळीच्या तरुणास मारहाण

सांगली : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणास चौघांकडून मारहाण झाली. सुशांत शंकर शेजूळ (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव असून शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

सावळजला तरुणास मारहाण

सांगली : सावळज (ता. तासगाव) येथील तरुणास काठीने मारहाण करण्यात आली. ऋषीकेश धोंडीराम पाटील (वय २५) असे जखमीचे नाव असून शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: One snake bite in Junekhed