सांगलीत घर फोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:21+5:302021-09-02T04:58:21+5:30

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अनिल पांडुरंग ...

One lakh items were smashed in Sangli | सांगलीत घर फोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास

सांगलीत घर फोडून एक लाखांचा मुद्देमाल लंपास

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अनिल पांडुरंग नांद्रेकर (रा. भोसले प्लॉट, शामरावनगर) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवार, दि.३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नांद्रेकर हे शामरावनगरमधील भोसले प्लॉटमध्ये कुटुंबीयांसह राहतात. मंगळवार, दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते कुटुंबीयांसह मिरज येथील नातेवाइकांकडे गेले होते. रात्री येऊन पुन्हा ते गेले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. बुधवारी सकाळी ते मिरजहून परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर नांद्रेकर यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार दाखल केली. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: One lakh items were smashed in Sangli