सांगलीत मालमत्तेच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:22+5:302021-04-11T04:25:22+5:30

सांगली : शहरातील हरभट रोडवर सुरू असलेल्या एका इमारतीमधील तीन गाळे आम्हाला हवेत म्हणत बांधकाम व्यावसायिकास मारहाण करण्यात आल्याची ...

One beaten up in Sangli property dispute | सांगलीत मालमत्तेच्या वादातून एकास मारहाण

सांगलीत मालमत्तेच्या वादातून एकास मारहाण

सांगली : शहरातील हरभट रोडवर सुरू असलेल्या एका इमारतीमधील तीन गाळे आम्हाला हवेत म्हणत बांधकाम व्यावसायिकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी योगेश गौरिश जोग (रा. मीरा हौसिंग सोसायटी, सांगली) यांनी श्रीमंधर भूपाल भोरे, त्यांची पत्नी, लहान भाऊ व प्रवीण श्रीमंधर भोरे (सर्व रा. हरभट रोड, सांगली) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सराफ व बांधकाम व्यावसायिक असलेल्या जोग यांचे हरभट रोडवर एका इमारतीचे काम चालू आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काम सुरू असलेल्या ठिकाणी ते सर्व आले व त्यांनी आम्हाला यातील तीन गाळे हवे आहेत म्हणत वादावादी करण्यास सुरूवात केली. त्यातून एका संशयिताने खोरे फेकून मारल्याने जोग जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: One beaten up in Sangli property dispute