शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाचे दागिने लंपास

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

सांगलीतील घटना : एसटी बस थेट पोलीस ठाण्यात

सांगली : येथील खणभागातील हेमा अमोल ननवरे या महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले. मुख्य बसस्थानकावर कागल-म्हसवड या एसटी बसमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. घटनेनंतर एसटी थेट शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.हेमा ननवरे यांचे नेवरी (ता. कडेगाव) हे माहेर आहे. आज (बुधवार) मतदान असल्याने त्या मतदान करण्यासाठी मंगळवारी दुपारी दोन मुलांना सोबत घेऊन नेवरीला जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी चार वाजता त्या कागल-म्हसवड बसमध्ये बसल्या. त्यावेळी एक महिला ‘अरे कुणाचे पाकीट मारले रे’, असे ओरडली. यामुळे बसमधील सर्व प्रवासी गोंधळून गेले. पळापळही झाली. त्यावेळी त्यांच्या पर्समधील एक पाकीट लंपास केले होते. या पाकिटामध्ये दीड लाखाचे दागिने होते. यामध्ये गंठण, चेन, अंगठी, वेडण, नेकलेस व नथ या दागिन्यांचा समावेश होता.हेमा ननवरे यांच्या खांद्याला पर्स अडकविली होती. दागिने त्यांनी एका पाकिटात घालून हे पाकीट पर्समध्ये ठेवले होते. पाकीट मारले म्हणून जी महिला ओरडली, त्या महिलेनेच पर्सची चेन काढून दागिन्यांचे पाकीट चोरले असावे, असा संशय आहे. या घटनेनंतर ओरडणारी ही महिलाही गायब झाली होती. नंतर बस थेट शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी काही प्रवाशांची झडतीही घेतली. रात्री उशिरा ननवरे यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)बसस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळमुख्य बसस्थानकावर चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला. सातत्याने प्रवाशांना लुटले जात आहे. या ठिकाणी पोलीस चौकी आहे. मात्र तरीही पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. जयसिंगपूर, इचलकरंजी या भागातील चोरटे चोरी करुन जात असल्याची चर्चा आहे.