बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड

By अविनाश कोळी | Updated: June 14, 2025 16:15 IST2025-06-14T16:13:36+5:302025-06-14T16:15:08+5:30

किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे ७ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते. 

On the Bedag-Karnataka road, seven lakhs were looted, cars were vandalized | बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड

बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड

मिरज : तालुक्यातील बेडग-मंगसुळी  रस्त्यावर  पाटील वस्ती नजीक एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिनेस्टाईलने दोन व्यापाऱ्यांकडील  सात लाख रुपये लुटले. पाठलाग करणारे लुटारू हे दोन वेगवेगळ्या चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लक्ष्मण कदम (वय २९) व विकास शंकरराव सोनटक्के (वय ३५, रा.  दोघे मुळशी पुणे)  असे लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे ७ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होते. 

बेडग-मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून  कोयत्याने चारचाकीच्या पुढील काचेवर हल्ला केला. यावेळी  भयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळत सुटले. 

लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले. हा लुटीचा प्रकार पहाटेचे चार वाजता घडला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद घटनास्थळी दाखल झाले. 

सांगली जिल्हा पोलिस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार सिने स्टाईलने झाल्याने रात्रीच्या प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

Web Title: On the Bedag-Karnataka road, seven lakhs were looted, cars were vandalized