शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी देता का अधिकारी..?

By admin | Updated: June 2, 2015 00:34 IST

आयुक्तांचे साकडे : महापालिकेतील रिक्त पदांबाबत प्रधान सचिवांना निवेदन

सांगली : रिक्त पदांमुळे विस्कळीत झालेल्या कारभाराबाबत महापालिकेच्या प्रत्येक विभागातून चिंता व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या पदांबरोबरच महापालिकेतील रिक्त पदांची संख्या ६०० च्या घरात गेली आहे. त्यामुळे आयुक्त अजिज कारचे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत साकडे घातले आहे. महापालिकेतील रिक्त असलेली मुख्य चार विभागप्रमुखांची पदे तरी प्राधान्याने भरावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्त कारचे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेत सध्या आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, मुख्य लेखापरीक्षक अशी चार महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या महत्त्वाच्या पदांवर सक्षम अधिकारी नसल्याने दैनंदिन कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊ नये ,यासाठी तातडीने या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या पत्राची दखल आता शासन कितपत घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या कारभारात सध्या रिक्त पदांचा परिणाम दिसत आहे. ३० मे रोजी एका दिवसात १२ कर्मचारी निवृत्त झाले. दरमहा सध्या ५ ते ६ कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल करीत आहेत. सध्या रिक्त पदांची संख्या ५७८ इतकी असून, पुढीलवर्षी ती सातशेच्या घरात जाणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेला या रिक्त पदांचा फटका बसत आहे. शहरातील नागरी सुविधांची कामे सुरळीत होत नाहीत. प्रशासकीय कामांमध्येही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा परिणाम जाणवत आहे. प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच प्रकारची पदे रिक्त आहेत. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दोन महिने पगार विलंबाने होत आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमधील उत्साह कमी होत आहे. यातूनच मग निवृत्ती जवळ आलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृती घेणे पसंत केले आहे. दरमहा आता असे ५ ते ६ अर्ज महापालिकेकडे दाखल होत आहेत. स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढीलवर्षी जवळपास १०० कर्मचारी निवृत्त होणार आहेत. म्हणजे पुढीलवर्षी जवळपास पावणेसातशे पदे रिक्त होतील. (प्रतिनिधी)