शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंदमध्ये आता कारभारी निवडीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाबबत उत्सुकता होती. निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत करून शेतकरी कामगार पक्ष व ...

येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाबबत उत्सुकता होती. निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत करून शेतकरी कामगार पक्ष व भाजपच्या ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १३ जागा मिळवत बाजी मारली. ग्राम विकास पॅनलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आठ तर भाजपच्या पाच जागा आहेत. सरपंचपद पहिली अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे; तर नंतरची अडीच वर्षे भाजपकडे राहणार आहे. सरपंच आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडल्याने शेतकरी कामगार पक्ष्याकडील प्रभाग पाच मधील निवडून आलेले राजेंद्र धनपाल शिरोटे, प्रभाग एकमधील अशोक शंकर माळी, प्रभाग सहामधील चंद्रकांत धोंडीराम नागजे यांच्यासह अनेक जण दावेदार राहणार आहेत.

चाैकट

कार्यक्षम चेहरा देण्यासाठी प्रयत्न

गेल्या पाच वर्षांच्या अस्थिर कारभाराला चोख प्रतिउत्तर देत मतदारांनी ग्रामविकास पॅनेलला पसंती दिली आहे. त्यामुळे गावच्या अनेक समस्यांबाबत नव्या सरपंच, पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळे कार्यक्षम चेहरा देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. यामुळे सरपंच कोण होणार? याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.