शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

ना गुलाल, ना फटाके!

By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST

अभिवादनाची होर्डिंग्ज : आबांना श्रद्धांजली

कवठेमहांकाळ : ना गुलाल, ना फटाके, ना जल्लोष... सुमनताई पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वाहिली आबांना श्रद्धांजली... असे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात बुधवारी दिसले. विजयानंतर तालुक्यात केवळ आबांच्या अभिवादनाची होर्डिंग्ज झळकली.१६ फेब्रुवारीला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण मतदारसंघासह राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आबांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते दु:खातून बाहेर पडले नव्हते, इतक्यात मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आबांचे कार्य लक्षात घेऊन भाजप, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, शेतकरी संघटना या प्रमुख पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. मात्र काही अपक्ष उभे ठाकल्याने निवडणूक लागली. ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमनताई पाटील यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात होते.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नील पाटील या अपक्ष उमेदवाराचे काम केल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात स्वप्नील पाटील किती मते घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी निकाल जाहीर झाला आणि सुमनताई यांनी १ लाख १२ हजार ९५६ इतक्या विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. मात्र आबांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर ना गुलाल उधळला, ना फटाके उडवले, ना रस्त्यावर उतरून जल्लोष केला. कवठेमहांकाळ तालुक्यात ठिकठिकाणी आबांची होर्डिंग्ज लावून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. (वार्ताहर)